Home Breaking News Chandrapur dist@ news • पायली-चिंचोली येथील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करा...

Chandrapur dist@ news • पायली-चिंचोली येथील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करा – कार्यकारी अभियंत्यांना उलगुलान संघटनेचे निवेदन सादर

112

Chandrapur dist@ news
• पायली-चिंचोली येथील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करा – कार्यकारी अभियंत्यांना उलगुलान संघटनेचे निवेदन सादर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: तालुक्यातील पायली-चिंचोली येथील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपीकांना पाणी देण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे .ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने आज करण्यात आली.तदवतंच शेतकऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन सादर करण्यात आले.

गोपाळा उपरे यांच्या शेताजवळ महावितरणचे ट्रान्सफॉर्मर आहे.परिसरातील शेतकऱ्यांना शेतीचे काम करणे सोयीचे व्हावे म्हणून हे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले.मात्र अनेक दिवसांपासून हे ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत आहे.परिणामी शेतपीकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत असून शेतपीकांचे नुकसान होत आहे.त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.याबाबत महावितरणला वारंवार निवेदन दिले.मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान बघता तात्काळ ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी राजु झोडे,नदीम रायपूरे,सागर कातकर,गोलू धोपटे आदिं शेतकरी बांधव उपस्थित होते