Home Breaking News Nagpur city@ news • सावित्री ब्रिगेडचा अनोखा रक्षाबंधन सोहळ.

Nagpur city@ news • सावित्री ब्रिगेडचा अनोखा रक्षाबंधन सोहळ.

144

Nagpur city@ news
• सावित्री ब्रिगेडचा अनोखा रक्षाबंधन सोहळा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नागपुर: अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिऑसाफिकल सोसायटी मैत्रेय लॉज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगाव येथील नवीन देसाई अनाथाश्रमात अनोखा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे तसेच प्रमुख पाहुणे सचिव निशिकांत मेहेत्रे , शोभा ठाकरे,गोपाल मसराम, सुनिल खाचणे,डॉ. हरीश कळमकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रणोती कळमकर यांनी केले. तसेच अनाथाश्रमावर कविता सादर केली. केतकी कडू आणि पद्मजा बनसोड यांनी रक्षाबंधनावर सुरेख गीत सादर केले.आश्रमातील ७० मुला-मुलींना राखी बांधण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना खाऊ आणि अदिती हिरूडकर या बालिकेचा वाढदिवसा प्रित्यर्थ रंग पेटी, ड्रॉईंग बुक व कार्ड बोर्ड सर्व मुला मुलींना भेट दिल्या. डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही गगनभरारी घ्या, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. सचिव निशिकांत मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीत पुढे कसे जावे हे सांगितले. यावेळी रक्षाबंधन थाळी सजावट स्पर्धा घेण्यात आली. सुनंदा जांबुतकर हिचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक जयश्री भाजीपाले,तृतीय क्रमांक शारदा घाडगे, प्रोत्साहनपर शोभा येवले यांचे क्रमांक आले.अनाथाश्रमातील बालकांनी विविध कार्यक्रम सादर केले.एका ३ वर्षिय बालिकेचा आईबद्दलचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.रक्षाबंधनाच्या दिवशी हा सोहळा आयोजित केल्यामुळे निरागस अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य बघण्याजोगे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल बनसोड तर आभार प्रदर्शन विद्या सुरकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला पाटील, रेणुका जोशी, वंदना क्षिरसागर,जयश्री मोहितकर, मदन गान ,सुमन गान, दर्शन राणेकर यांनी सहकार्य केले.