Home Breaking News Sindevahi @news • सिंदेवाही जवळ घडलेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू, तर मुलगी...

Sindevahi @news • सिंदेवाही जवळ घडलेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू, तर मुलगी गंभीर जखमी • खर्रा खाल्ल्याने पत्नीचा जीव गमावला •टू व्हीलर चालवताना चक्कर येऊन चालकाचे नियंत्रण सुटले

684

Sindevahi @news
• सिंदेवाही जवळ घडलेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू, तर मुलगी गंभीर जखमी
• खर्रा खाल्ल्याने पत्नीचा जीव गमावला
•टू व्हीलर चालवताना चक्कर येऊन चालकाचे नियंत्रण सुटले

चंद्रपूर :- नागभीड तालुक्यातील भुयार येथील लवकेश रेचनकार वय ३४ वर्षे, पत्नी मिनाक्षी रेचनकार वय २९ वर्षे, व मुलगी मनस्वी रेचनकार वय ६ वर्षे हे भुयार वरुन सिंदेवाही मार्गे पाथरी चक विरखल येथे राखी सणा निमित्य दुचाकी वाहनाने जात होते. परंतु सिंदेवाही मेंढा माल जवळ लवकेश रेचनकार याला चालु वाहनांवर चक्कर आली. चक्कर येताचं वाहनाचं संतुलन बिघडले आणि तिघेही रस्त्यावर पडलेत. यात पत्नी मिनाक्षी रेचनकार या महीलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी मनस्वी रेचनकार ही गंभीर जखमी झाली आहे. लवकेश रेचनकार व मुलगी मनस्वी रेचनकार ह्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी सिंदेवाही पोलीसांनी दाखल केले. परंतु मुलगी मनस्वी रेचनकार हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ १०८ रुग्णवाहिका ने हलविण्यात आले. सदर प्रकार हा लवकेश रेचनकार यांनी गाडी चालवताना खर्रा खाल्ले होते. त्यामुळे त्यांना गाडीवरच चक्कर आली. आणि त्यात गाडीचे नियंत्रण सुटले. व तिघेही जण खाली पडले.

सदर प्रकार सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढा माल या गावाजवळ घडला. घटनेची माहिती लगेच सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे सिंदेवाही पोलीस त्वरित घटनास्थळी जावून पंचनामा केला. आणि जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगी मनस्वी ची तब्येत गंभीर असल्याने तिला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मुलीसोबत सिंदेवाही चे पोलिस निरीक्षक तुशार चव्हाण यांनी कर्तव्याची जबाबदारी स्वीकारत चंद्रपूरला सोबत गेले आहेत. लवकेश रेचनकार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने सिंदेवाही येथे उपचार सुरू आहे.