Home Breaking News Nagpur city@ news • प्रवक्तापदी डॉ. स्मिता मेहेत्रे यांची निवड !

Nagpur city@ news • प्रवक्तापदी डॉ. स्मिता मेहेत्रे यांची निवड !

138

Nagpur city@ news
• प्रवक्तापदी डॉ. स्मिता मेहेत्रे यांची निवड !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

नागपुर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी डॉ. स्मिता निशिकांत मेहत्रे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रवक्तापदी बिनविरोध निवड केली आहे. डॉ.स्मिता मेहेत्रे अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, श्री.पांडुरंग शिक्षण संस्था थिऑसाफिकल सोसायटी आदींच्या अध्यक्ष असून लेखिका, कवयित्री, नाट्य कलावंत आणि प्रबोधनकार आहेत.त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिका देखील आहेत.
दरम्यान शरयूताई तायवाडे, शरद वानखेडे ,इंजि. सुषमा भड,ॲड. रेखा बाराहाते ,. वृंदाताई ठाकरे, साधना बोरकर, शारदाताई हाडगे, शितल बनसोड ॲड. रोमा खंडवानी, डॉ.दीपा हटवार ,.रजनी चव्हाण, ॲड. नितीन देशमुख, निशिकांत मेहेत्रे, विद्या सुरकार, सुनंदा जांबुतकर, प्रणोती कळमकर, विजया दहीकर ,राजेश राणेकर ,प्रज्वला तट्टे ,ॲड. स्मिता गणेशे, वंदना क्षिरसागर, प्रशांत रामटेके आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सामाजिक कार्यात स्मिता मेहेत्रे यांचे योगदान आज पावेतो अतिशय मोलाचे ठरले आहे.