Home Breaking News Chandrapur city@ newd • उलगुलान संघटनेच्या प्रयत्नाला आले यश ! • आंदोलनाचा...

Chandrapur city@ newd • उलगुलान संघटनेच्या प्रयत्नाला आले यश ! • आंदोलनाचा इशारा देताच – वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी नरमले ; आंदोलनापूर्विच”त्यांनी” कामगारांच्या मागण्या केल्या मान्य !

113

Chandrapur city@ newd
• उलगुलान संघटनेच्या प्रयत्नाला आले यश !
• आंदोलनाचा इशारा देताच –
वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी नरमले ; आंदोलनापूर्विच”त्यांनी” कामगारांच्या मागण्या केल्या मान्य !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी अखेर उलगुलान संघटनेंसमोर नरमले असून आंदोलनापूर्वीच त्यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहे.मागील कित्येक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जात होती.

याबाबत येत्या पाच सप्टेंबरला उलगुलान कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार होते.दरम्यान वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी व्यवस्थापनाने उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व येथील कामगारांना चर्चेसाठी बोलावले.कामगारांचा पीएफ खात्यात जमा करणे, कामगारांचे वेतन नियमित 10 तारखेला देणे व अन्य महत्त्वाच्या मागण्यां बैठकीत मान्य करण्यात आल्या.या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्या कुणाल कंपनीने मान्य करुन लेखी पत्र दिले.या वेळी सी एस टी पीएसचे उपमुख्य अधिकारी राठेर ,महेश राजुरकर, वंजारी कुणाल ,कंपनीचे ठेकेदार प्रतिनिधि कमलेश दास, उपस्थित होते. त्यामुळे उलगुलान संघटनेचे होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

आंदोलन जरी स्थगित करण्यात आले असले तरी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे,रवि पवार,गुरू भगत, कुणाल चौधरी, सुमित भिमटे, मंगेश बदकल, अक्षय राउत,अभय सपाट,शाम चुके,मोनू मटाले,प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मडावी,सुधीर डाहाकी, आनंद पुणेकर,राजु जागने, प्रफुल्ल पाटिल व राहुल वाभले यांनी दिला आहे.