Home Breaking News Chandrapur dist @news • व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने पिपरी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम...

Chandrapur dist @news • व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने पिपरी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न! •कु.किरण सावळींसह अनेकांची कार्यक्रमाला उपस्थिती !

377

Chandrapur dist @news
• व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने पिपरी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न!
•कु.किरण सावळींसह अनेकांची कार्यक्रमाला उपस्थिती !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

भद्रावती:रक्षाबंधन हा सण आपल्या कडे अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येतो.भावा बहीणींच्या अतुट प्रेमाचे प्रतिक म्हणून हा सण देशभरात सर्वत्र ओळखल्या जातो .आज शनिवार दि. 2 सप्टेंबरला व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने भद्रावती तालुक्यातील पिपरी दे. ग्रामपंचायती मध्ये रक्षा बंधनाचा एक कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमात ग्रामपंचायत पिपरीचे कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.

आयोजित कार्यक्रमाला ग्राम पंचायतीच्या सरपंच अर्चना नांदे ,विजय मडावी,ग्राम पंचायत सदस्य काजल चव्हाण, बाळकृष्ण कामटकर,तंटामुक्ती समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष कलावती कोडापे,तंटा मुक्ती समितीचे माजी अध्यक्ष भाऊराव कुटेमाटे,शाळेचे मुख्याध्यापक संजय मासळकर ,शिक्षकगण
अनिल भगत ,साधना उपगंलावर,रामटेके ,सुरज कुटेमाटे, पंकज कावडे, शुभम नांदे, मंगेश मडकाम,
गौरव नांदे, सुरज नांदे,पुष्पा नगराळे,सिद्धार्थ वलेकर
सुधांशू कामटकर,संध्या कामटकर व व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या अध्यक्ष कु,किरण विजय साळवी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.