Home Breaking News Chandrapur city@ news • सकाळी चंद्रपूर नगरीतील गोल बाजारात एकाची गळा चिरून...

Chandrapur city@ news • सकाळी चंद्रपूर नगरीतील गोल बाजारात एकाची गळा चिरून हत्या! • शहरात उडाली खळबळ ! • पोलिस पथक घटनास्थळी दाखल

1021

Chandrapur city@ news
• सकाळी चंद्रपूर नगरीतील गोल बाजारात एकाची गळा चिरून हत्या!
• शहरात उडाली खळबळ !
• पोलिस पथक घटनास्थळी दाखल

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :- आज रविवारी भल्या सकाळी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या स्थानिक गोल बाजार परिसरात एका व्यक्तीची गळा चिरून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.या घटनेतील मृतकाचे नांव
मधुकर मंदेवार असे सांगितले जाते .तो चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवाशी असून त्याचे वय अंदाजे ७०वर्षाचे आहे.दिवसभर भिक्षा मागून तो आपल्या पोटाची भूक भागवित होता. दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली.
शहर पोलिस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .सध्या या घटनेचा तपास पोलिस करीत आहे. मृतकाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार आहे .त्यातच त्याचा प्राण गेला असा कयास व्यक्त केल्या जात आहे.
पोलिसांनी या परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे .दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार , शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजपूत व अन्य पोलिस पथक दाखल झाले असल्याचे वृत्त आहे .पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे समजते.