Home Breaking News • सहज सुचलं आरोग्य विषयक मार्गदर्शन गृपच्या मुख्य संयोजिकपदी कल्पना बनकर यांची...

• सहज सुचलं आरोग्य विषयक मार्गदर्शन गृपच्या मुख्य संयोजिकपदी कल्पना बनकर यांची नियुक्ती!

127

सहज सुचलं आरोग्य विषयक मार्गदर्शन गृपच्या मुख्य संयोजिकपदी कल्पना बनकर यांची नियुक्ती!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

साहित्य, सामाजिक शैक्षणिक व कला क्षेत्रातील कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या नव्याने निर्माण झालेल्या आरोग्य विषयक मार्गदर्शन गृपच्या मुख्य संयोजिकपदी मुंबईच्या कल्पना गणेश बनकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या मायाताई कोसरे व राजू-याचा अधिवक्ता मेघा धोटे यांनी केली आहे.दरम्यान या नियुक्तीचे रंज्जू मोडक, रजनी रणदिवे, विजया भांगे ,अल्का सदावर्ते, प्रिती उमरे, पायल दुपारे, प्रियंका चव्हाण, वर्षा कोंगरे,किरण साळवी यांचेसह अनेकांनी स्वागत केले आहे.