Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूर- बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण...

Chandrapur city@ news • चंद्रपूर- बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू -आम आदमी पार्टीचा मनपाला इशारा! • आयुक्त करीत आहे “या “कडे सातत्याने दुर्लक्ष; विठ्ठल मंदिर वार्डातील काही भागात आज ही पाण्यासाठी बोंबाबोंब सुरुच!

135

Chandrapur city@ news
• चंद्रपूर- बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू -आम आदमी पार्टीचा मनपाला इशारा!

• आयुक्त करीत आहे “या “कडे सातत्याने दुर्लक्ष; विठ्ठल मंदिर वार्डातील काही भागात आज ही पाण्यासाठी बोंबाबोंब सुरुच!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : 04 सप्टेंबर, 2023 चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसांगणिक वाढत आहे. एव्हढेच नाही तर नगर परिषदेचे मनपात रुपांतर झाल्या नंतर ही काही महत्त्वाच्या समस्या आजही या शहरात बघावयास मिळत आहे. चंद्रपूरातील विठ्ठल मंदिर वार्डातील काही भागात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरु आहे.तक्रार करून ही हा महत्वाचा प्रश्न सुटत नाही .त्यामुळे चंद्रपूर मनपा विषयी जनतेत नाराजीचा सूर उमटला आहे.दरम्यान शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. शहराच्या बाबूपेठ प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त होत असल्याचे एकंदरीत दिसून येते.

आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागत होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कंत्राटदाराकडून कामात सतत दुर्लक्ष होत आहे. कामाची गुणवत्ताही चांगली नसल्याचा स्पष्ट आरोप कुडे यांनी केला आहे.अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले !यामुळे रस्त्याची परिस्थिती वाईट झाली आहे. त्यातल्या त्यात वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात नुकतेच एक लेखी निवेदन महानगरपालिकेला आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले. निवेदन सादर करताना आम आदमी पार्टीचे जेष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या तब्बसुम शेख, सुधीर पाटील अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, जयदेव देवगडे, अजय बाथव, भिमराज बागेसर आदिं उपस्थित होते.

मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष ;जनतेत उमटला नाराजीचा सूर !

शहरातील काही भागात आजही मनपा कडुन पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महिला वर्ग पाण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र काही भागात बघावयास मिळत आहे.निव्वळ अमृत योजनेच्या नावाखाली मनपा वेळकाढूपणा धोरण अवलंबित असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे.

“आम्ही मनपा प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर एक महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
– राजू कुडे, शहर सचिव