Home Breaking News Bhadrawati taluka@news • भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Bhadrawati taluka@news • भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

137

Bhadrawati taluka@news
• भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, विसापूर येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धाचे दिनांक २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील रितिका बोस या खेळाडूंची गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक तसेच रोहन कांबळे या खेळाडूंची भालाफेक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेकरिता निवड झाली. महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन डेरवण, रत्नागिरी जिल्हा येथे ३० सप्टेंबर ते १ आक्टोंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.
महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगीता बांबोडे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जंयत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजू गावंडे,प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे, डॉ. विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ.प्रकाश तितरे, डॉ सुधीर आष्टुनकर, प्रा. मोहित सावे, डॉ. यशवंत घुमे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.