Home Breaking News Chandrapur city@ news • गणरायाच्या आगमना पूर्वी शहर स्वच्छ व सुंदर करा...

Chandrapur city@ news • गणरायाच्या आगमना पूर्वी शहर स्वच्छ व सुंदर करा : आ. किशोर जोरगेवार • चंद्रपूर मनपा अधिका-यांशी बैठक -आ.जोरगेवारांनी केल्या सूचना!

138

Chandrapur city@ news
• गणरायाच्या आगमना पूर्वी शहर स्वच्छ व सुंदर करा : आ. किशोर जोरगेवार
• चंद्रपूर मनपा अधिका-यांशी बैठक -आ.जोरगेवारांनी केल्या सूचना!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसांत सणासुदीचे दिवस सुरु होणार आहे. अशातच स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता स्वच्छतेकडे अधिक लक्ष देत पुर्ण यंत्रणा कार्यन्वित करुन गणरायाच्या आगमनापूर्वी संपुर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना आज एका बैठकीत दिल्या आहे.

स्वच्छतेसह शहरातील इतर समस्यांबाबत आमदार जोरगेवार यांनी महानगर पालिकेच्या कार्यालयात अधिका-यांची बैठक घेतली आहे. सदरहु बैठकीत त्यांनी काही महत्त्वाच्या व आवश्यक सूचना केल्या आहे. बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, रविंद्र हजारे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. वनिता गर्गेलवार, स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. अमोल शेळके यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करणसिंह बैस, दत्तु गवळी, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, दुर्गा वैरागडे, आशा देशमूख आदींची उपस्थिती लाभली होती.

मागील काही महिण्यांमध्ये शहरात अस्वच्छता दिसुन येत आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. डेंगूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने आपण स्वच्छतेकडे अधिक भर दिला पाहिजे. प्रत्येक प्रभागात नियमीत स्वच्छता केल्या जात असल्याबाबतची अधिका-यांनी शहानिशा करणे आवश्यक आहे. प्रभागात घंटा गाडी येण्याचा ठराविक असा वेळ नाही. त्यामुळे घंटा गाडीच्या फेरीचा वेळ निर्धारित करण्यात यावा, नागरिकांनी संकलित केलेला कचरा घंटागाडीतच टाकल्या जावा याबाबत पून्हा जनजागृती करण्याचे काम मनपाने हाती घ्यावे, चौकात कचरा साचून राहणार नाही याची योग्य काळजी घेण्यात यावी, शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यात यावे, फॉगींग मशीनीने जंतू नाशक फवारणी योग्य रित्या करण्यात यावी अशा आशयाच्या सुचना सदरहु बैठकीत आमदार जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहे.

रामाळा तलाव परिसरात रस्त्यावर घान जमा असते त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, नगिनाबाग, जलनगर, बिनबा गेट, भिवापूर यासह इतर काही भागात नियमीत नाली सफाई होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, परिसरात कचरा असेल तर त्याचा फोटो नागरिकांना मनपाच्या व्हाॅट्सअप वर पाठवता आला पाहिजे. यासाठी व्हॉट्सअप नंबर सुरु करण्यात यावा, मटन मार्केट मधून निघणा-या कचरा व घाणीचा बंदोबस्त करण्यात यावा अशा देखील सूचना त्यांनी यावेळी केल्या आहे. मनपाकडे मोठी यंत्रणा आहे. याचा योग्य वापर करत या यंत्रणेवर अंकुश ठेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवित सर्व यंत्रणांनी संयुक्तरित्या काम करावे अशा सूचना यावेळी त्यांनी मनपा अधिका-यांना या पार पडलेल्या बैठकीतून दिल्या आहे.