Home Breaking News Chimur taluka@ news •नाट्यकलावंत तथा सुपरिचित व्यापारी सुरेश कामडी यांची नेरी तंमुसच्या...

Chimur taluka@ news •नाट्यकलावंत तथा सुपरिचित व्यापारी सुरेश कामडी यांची नेरी तंमुसच्या अध्यक्षपदी निवड • अनेकांनी केले कामडी यांचे अभिनंदन !

77

Chimur taluka@ news
•नाट्यकलावंत तथा सुपरिचित व्यापारी सुरेश कामडी यांची नेरी तंमुसच्या अध्यक्षपदी निवड
• अनेकांनी केले कामडी यांचे अभिनंदन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील एक जेष्ठ नाट्यकलावंत,नेरी येथील सुपरिचित व्यापारी तथा सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कामडी यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .काल गुरुवार दि.७ सप्टेंबरला नेरी येथील ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा स्थानिक राष्ट्रसंत सभागृहात पार पडली .या ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी नेरी ग्राम पंचायतच्या सरपंच रेखा पिसे ह्या होत्या. यावेळी ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी एन.जी. धवने,उपसरपंच चंद्रभान कामडी व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यगणांची उपस्थिती लाभली होती.

तदंपूर्वी ग्रामसभेत गावातील अनेक समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महात्मा गांधी गांव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी या वेळी ग्रामसभेतुन दोन नांवे सुचविण्यात आली होती.त्यात प्रामुख्याने हरीदास चांदेकर व सुरेश कामडी यांच्या नावांचा समावेश होता.दरम्यान हरिदास चांदेकर यांनी या निवडीतून आपली माघार घेत सुरेश कामडी यांना नेरी तंमुसचा अध्यक्ष होण्याचा मान दिला .त्यामुळे सहजचं कामडी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. एव्हढेच नाही तर त्यांच्या या निवडीला उपस्थितांनी या वेळी सर्वानुमते दुजोरा दिला .

कलाक्षेत्रात आपली आगळी वेगळी छाप सोडणारे सुरेश कामडी हे व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष,माजी ग्रामपंचायत सदस्य तथा या पूर्वी देखिल त्यांनी तंमुसच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्विपणे सांभाळली होती हे सर्वश्रूतच आहे. त्यांचा सामाजिक कार्यातील अनुभव हा दांडगा आहे.

तत्कालीन नेरी तंमुसचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रकरणाचा निपटारा केला होता त्याच कालावधीत नेरी ग्रामपंचायतला शासनाकडून सात लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता .हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.आज पावेतो त्यांचे सामाजिक कार्यात फार मोलाचे योगदान राहिले आहे .

कामडी यांची तंमुसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नेरीकरांनी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.