Home Breaking News Ballarpur city@ news • ‘मिशन मून’ वर सामान्य ज्ञान स्पर्धा ...

Ballarpur city@ news • ‘मिशन मून’ वर सामान्य ज्ञान स्पर्धा • एम.जे.एफ कॉलेजमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

41

Ballarpur city@ news
• ‘मिशन मून’ वर सामान्य ज्ञान स्पर्धा

• एम.जे.एफ कॉलेजमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

बल्लारपूर :- ‘मिशन मून’ या विषयावर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील इंग्लिश मीडियम कॉमर्स विभागातर्फे दिनांक ३ सप्टेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत १४ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये विद्याश्री कॉन्व्हेंट बल्लारपूर, बल्लारपूर पब्लिक स्कूल, सेंट पॉल स्कूल बामनी, माउंट इंग्लिश मीडियम स्कूल, रेड रोज कॉन्व्हेंट, वैभव कॉन्व्हेंट, महात्मा फुले हिंदी-उर्दू-तेलगू शाळा, सर्वोदय विद्यालय, वियानी जुब्ली स्कूल, आयडियल कॉन्व्हेंट, साईबाबा कॉन्व्हेंट, क्रिसेंट पब्लिक स्कूल व न्यू इंडिया कॉन्व्हेंट या शाळांचा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते.
९ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा आयोजित केले. त्यात प्रमुख पाहुणे दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूलचे गणिताचे शिक्षक प्रवीण विघ्नेश्वर उपस्थित होते. तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.जे.एफ इंग्लिश मीडियम कॉमर्स विभागाच्या प्रमुख सौ समृद्धी मसादे उपस्थित होत्या.
जगभरामध्ये मिशन मून वर चर्चा सुरू असून भारताने मिशन मून यशस्वीरित्या पार पाडले त्याबद्दल या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी 50% च्या वर गुण प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार सेंट पॉल स्कूल बामणी चा विद्यार्थी सोहम शेरकी याला मिळाला. तसेच द्वितीय पुरस्कार माउंट इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी मानसी भटारकर हिने प्राप्त केला. तृतीय पुरस्कार सेंट पॉल स्कूल बामणी ची विद्यार्थिनी अक्षरा साखरकर हिने प्राप्त केला. चतुर्थ पुरस्कार विद्याश्री कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी अक्षता हमंद ने प्राप्त केला तर पाचवा पुरस्कार तनवी खाडीलकर ने मिळवला ती बल्लारपूर पब्लिक स्कूल एनबोडी ची विद्यार्थिनी आहे. प्रमुख अतिथी प्रवीण विघ्नेश्वर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये मिशन मून वर माहिती दिली. त्याशिवाय दहाव्या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच अभ्यासक्रमावर अशा प्रकारची परीक्षा आयोजन केली पाहिजे त्यासाठी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं.

त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये इंग्लिश मीडियम कॉमर्स च्या प्रमुख मसादे मॅडम यांनी सायन्स हाच फक्त पर्याय नसून इंग्लिश मीडियम कॉमर्स हा सुद्धा विकल्प आहे. आपल्याला सी.ए आणि सी.एस बनण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यानंतर आभार प्रदर्शन गुनगुन बनिया हिने केले. कार्यक्रमाचे समापन राष्ट्रगीताने झाले. कार्यक्रमाचे संचालन गायत्री पांबी हिने केले व प्रास्ताविक जेसिका मातंगी तर आभार प्रदर्शन गुनगुन बनिया यांनी केले.