Home Breaking News Chandrapur city@ news • मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ! • एका...

Chandrapur city@ news • मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ! • एका शिष्टमंडळाने केली निवेदनातून मागणी

133

Chandrapur city@ news
• मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या !
• एका शिष्टमंडळाने केली निवेदनातून मागणी

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसीला मिळालेलं आरक्षण हे मराठ्यांचा विरोध पत्करून मिळालेलं आहे. त्यातही 52 ओबीसीना महाराष्ट्रात केवळ 19%:आरक्षण आहे. कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन एका जातीला खुश करण्यासाठी 346 जातींचा रोष सरकारने ओढवून घेऊ नये असा इशारा देणारे निवेदन आज दि .11 सप्टें. 2023 ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत प्रधानमंत्री,गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.या वेळी ओबीसी जनगणना संयुक्त समन्वय समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे, हिराचंद बोरकुटे, एल. व्ही. घागी, प्राचार्य सूर्यकांत खनके, सूर्यभान झाडे, विलास माथणकर, डी. के. अरीकर, दिलीप होरे, योगेश आपटे, डॉ .देव कन्नाके, चंदूभाऊ लडके, हेमलता होरे, पावडे भास्कर सपाट, येरगुडे, मनीषा बोबडे, विठ्ठलराव भगत, दिलीप मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.