Home Breaking News Chandrapur dist@ news • एका कास्तकाराच्या शेत जमिनीत वाघीणीचा मृत्यू ? ...

Chandrapur dist@ news • एका कास्तकाराच्या शेत जमिनीत वाघीणीचा मृत्यू ? •मूल तालूक्यातील घटना !

48

Chandrapur dist@ news
• एका कास्तकाराच्या शेत जमिनीत वाघीणीचा मृत्यू ?
•मूल तालूक्यातील घटना !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मूल (चंद्रपूर):चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील एका शेतात वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पपलु वामन शेंडे नावाचे एक व्यक्ती चंद्रपूर येथील रहिवाशी असलेले जगदीश गावतुरे यांची शेती करतात.

आज मंगळवारला सकाळी ७:३०वाजताच्या दरम्यान काही महिला मजुर त्या शेतात निंदन काढण्यासाठी गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी एक वाघीन मृतावस्थेत आढळून आली. लगेचच त्यांनी ही माहिती शेत मालकाला दिली.दरम्यान शेतमालकाने फिस्कुटी येथील् सरपंचाच्या वतीने त्या घटनेची माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविली .माहीती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळावरील प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण त्या ठिकाणी मृत अवस्थेत
आढळूण आली.विशेष म्हणजे गेल्या रविवारला संध्याकाळी मूल-सिंदेवाही या मुख्य मार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता . त्या दिशेने वनविभागाचा तपास सुरू असतांनाच आज ही घटना उजेडात आली.