Home Breaking News Chandrapur dist@ news • बॅंकेची हुकुमशाही ; अर्धनग्न आंदोलन करण्याचा शेतकरी संघटना...

Chandrapur dist@ news • बॅंकेची हुकुमशाही ; अर्धनग्न आंदोलन करण्याचा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीचा इशारा!

69

Chandrapur dist@ news
• बॅंकेची हुकुमशाही ; अर्धनग्न आंदोलन करण्याचा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीचा इशारा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

जिवती: तालुका अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भाग असुन येथील शेती ही कोरडवाहू क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांना एकदाच पीक घेता येते .दुभार पीक घेण्यासाठी मुबलक पाण्याची सोय नसल्याने कोरडवाहू शेती करुन तालुक्यातील शेतकरी उदरनिर्वाह भागविता अशातच तालुक्यातील शेतकरी पेरणी करण्यासाठी बी बियाणे खते औषधी घेण्यासाठी पीक कर्जासाठी भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे अर्ज करून सुध्दा आज पर्यंत काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर झाले नाही .

दररोज शेतकऱ्यांना बॅंकेचे चकरा मारून बॅंकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे अर्जदाराने (शेतकरी) बॅंकेत पीक कर्ज मंजूर झाले का असे विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत बॅंकेच्या वतीने पीक कर्जाची फाॅईल तहसील कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते तहसील कार्यालयातून तपासणी झाल्यानंतर ती परत बॅंकेला पाठविण्यात येते .परंतु बॅंकेचे मॅनेजर पीक कर्जाची फाईल तपासणी करण्याऱ्या अधिका-याला म्हणत आहे कि कर्जासाठी दिलेले कागदपत्रे बोगस आहे .एका प्रकारे महसूल विभागाला ते आव्हान देत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले नाही. त्या शेतकऱ्यांनच्या बॅंक खात्यावर होल्ड लावण्यात आले आहेत.होल्ड लावण्यात आलेल्या खात्यावर पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना ,दिव्यांग योजना, घरकुल योजना अश्या अनेक योजनेंचा निधी जमा होत असून खात्यावर होल्ड लावण्यात आल्यामुळे खात्यातून रक्कम काढता येत नाही .आणि इतरही आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने दि.११ सप्टेंबरला जिवतीचे तहसीलदार व भारतीय स्टेट बँक पाटणचे मॅनेजर यांना शेतकरी संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती जिवतीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले.

सदहु निवेदनात मागणी करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी आणि बॅंक खात्यावर होल्ड लावण्यात आले आहेत ते तात्काळ हटविण्यात यावे .मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १८सप्टेंबरला दुपारी १२ वाजता बॅंके समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार ग्रामपंचायत शेणगावचे उपसरपंच नरसिंग हामने, विनोद पवार ,रामेश्वर नामपल्ले , लक्ष्मण पवार, सुदाम राठोड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.