Home Breaking News Chandrapur city@ news • मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास होतोय कडाडून...

Chandrapur city@ news • मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास होतोय कडाडून विरोध ! •चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन सादर !

35

Chandrapur city@ news
• मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास होतोय कडाडून विरोध !
•चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन सादर !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली आहे आणि महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला कुणबी मध्ये समाविष्ट करून त्यांच्या ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्याचा प्रयत्नांत आहे.परंतु चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचा त्यासाठी कडाडून विरोध आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे.परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देऊन नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाचे कुटील कटकारस्थान आहे आणि त्या कटकारस्थाचा डाव हाणून पाडण्यासाठी ओबीसी समाज सज्ज आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण काही जिल्ह्यांमध्ये २% ,५% ,८% अशा प्रकारचे राहिले आहे आणि या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असुन यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीही लांबणीवर गेल्या आहेत.
तरी मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी.

या बाबतीत एक लेखी निवेदन चंद्रपूर उपजिल्हाधिका-यांना सादर करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी विजय नळे,सुरेश बोडणे, दिनकर चौधरी,बाळकृष्ण पानघाटे,रमेश चौधरी आदिंची उपस्थिती होती.