Varora taluka@ news
•शासनाकडून मिळालेला गौरी – गणपती आनंदाचा शिधा वाटपास होतोय येत्या 16 सप्टेंबर पासून प्रारंभ
•32 हजार 932 लाभार्थ्यांना होणार या शिधा वाटपाचा लाभ!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
वरोरा:येथील स्थानिक सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत अंतोदय प्राधान्य गट योजना मधील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रति लाभार्थीना आनंदाच्या शिधाचा एक संच वितरण करण्याचे राज्य शासनाने घोषित केले. आहे.दरम्यान वरोरा तालुक्यात एकूण 32 हजार 932 शिधापत्रिका लाभार्थी आहे. त्यांना वाटप करण्याकरिता हे संच उपलब्ध झालेले आहे . व वितरणाचे काम येत्या 16 सप्टेंबर पासून सुरू होत आहे.
येथे उपलब्ध झालेल्या संचामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक किलो पाम तेलाचा समावेश आहे.तदवतंच एका शिधापत्रिका धारकास देण्यात येणाऱ्या या संचाची किंमत शासनाने फक्त शंभर रुपये ठरविलेली आहे.वरोरा तालुक्यातील सर्व शासकीय रास्त भाव दुकानात शिधापत्रिका संच पोहोचवणे सुरु असून स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप सुरू होत आहे.
आनंदाच्या शिधाचा दर्जाबाबत ग्राहकांनी आपले मत व अभिप्राय व्यक्त करण्याकरिता शासनाने सर्व शासकीय धान्य दुकानात क्यू आर कोड प्रदर्शित केले आहे. सदर क्यू आर कोड स्कॅन करून आपले अभिप्राय नोंद करावे. असे आवाहन वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.