Home Breaking News Ballarpur taluka@ news • विसापुर ग्रामपंचायत व जेसीआय ने केले सर्ज्या राजांचे...

Ballarpur taluka@ news • विसापुर ग्रामपंचायत व जेसीआय ने केले सर्ज्या राजांचे औक्षण • स्मुर्तीचिन्ह प्रदान करून शेतकऱ्यांचा केला सन्मान • बैल पोळ्याला आले जत्रचे स्वरूप

265

Ballarpur taluka@ news
• विसापुर ग्रामपंचायत व जेसीआय ने केले सर्ज्या राजांचे औक्षण
• स्मुर्तीचिन्ह प्रदान करून शेतकऱ्यांचा केला सन्मान
• बैल पोळ्याला आले जत्रचे स्वरूप

सुवर्ण भारत:अंकेश्वर मेश्राम(सहसंपादक)

विसापूर : आपली संस्कृती उत्सव प्रिय आहे.यात ग्रामीण भागातील बळीराजांचा बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. पिठोरी अमावश्येला हा शेतकऱ्यांचा मोठा सण विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा करण्यात आला. यावेळी जेसीआय रायल क्लब राजरा येथील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्मुर्तीचिन्ह प्रदानकरून सन्मान केला.बैल पोळ्यात सहभागी प्रत्येक बैल जोडीचे व शेतकऱ्यांचे औक्षण ग्रामपंचायत व जेसीआय च्या पदाधिकाऱ्यांनी केले.विसापूर येथील बैल पोळ्याला जत्रेचे स्वरूप आले.

विसापूर ग्रामपचायतच्या वतीने बळीराजाला व बैल जोडीला औक्षण करून पोळा भरविला जातो.पारंपरिक पद्धतिने साजऱ्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोठ्या सणाला यावर्षी पहिल्यांदा जेसीआय रायल क्लब ,राजुरा येथील पदाधिकारी मधुस्मिता पांडे,जयश्री शेंडे,सुषमा शुक्ला,सुशीला पुरेड्डीवर, स्मुर्ती व्यवहारे,मंजू गौतम,स्मिती चौव्हान, फकीर मोहन,स्वतंत्रकुमार शुक्ला,पराग व्यवहारे यांनी विसापूर येथील पोळ्यात सहभाग घेऊन सर्जाराजांचे व शेतकऱ्यांचे मनःपूर्वक औक्षण केले.याला सहकार्य विसापूर येथील सरपंच वर्षा कुलमेथे,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले,रीना कांबळे,वैशाली पुणेकर,शशिकला जीवने ,गजानन पाटणकर,सुनील रोंगे,सूरज टोमटे ,लिपिक संतोष निपुंगे व ग्रामपचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

पोळा सण म्हणजे वर्ष भर शेतात राबणाऱ्या बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त दिवस.ग्रामीण भागाच्या संस्कृतीत पोळा सणाला अन्यसाधारण महत्व आहे. यांत्रिकी युग असले तरी,आजही बैल जोडी च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पिकपाणी घ्यावे लागत आहे. बळीराजा या सणाला आपल्या सर्ज्या राजाला अंघोळ घालून त्याची रंगरांगोटी करतो.त्याच्येवर झुलीचा साज सजवतो. मोठ्या मनाने पोळ्यात सहभागी होतो.आपला आनंद द्विगुणित करतो.

याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत व जेसीआय राजुरा रायल क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच बैल जोडी धारक शेतकऱ्यांचे व त्यांच्या सर्ज्या राजांचे औक्षण केले.उत्कृष्ट सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मुर्तीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना टॉवेल प्रदान करून सन्मान व औक्षण करण्यात आले.यावेळी गावाला जत्रेचे स्वरूप आले.