Home Breaking News Ballarpur taluka@ news • बाल शेतकऱ्यांनी केले देखाव्यातून शेतकऱ्यांच्या व्यथेवर भाष्य •...

Ballarpur taluka@ news • बाल शेतकऱ्यांनी केले देखाव्यातून शेतकऱ्यांच्या व्यथेवर भाष्य • विसापुरातील तान्हा पोळ्यातील जागृती संदेश • श्री पंढरीनाथ देवस्थान केले आयोजन

43

Ballarpur taluka@ news
• बाल शेतकऱ्यांनी केले देखाव्यातून शेतकऱ्यांच्या व्यथेवर भाष्य
• विसापुरातील तान्हा पोळ्यातील जागृती संदेश
• श्री पंढरीनाथ देवस्थान केले आयोजन

✍️अंकेश्वर मेश्राम
सुवर्ण भारत:सहसंपादक

विसापूर : आपला देश कृषी प्रधान आहे.देशाची अर्थ व्यवस्था पन्नास टक्क्यावर कृषी व्यवस्थेवर आधारित आहे. मात्र आजघाडीला बळीराजा अडचणीत आला आहे. नापिकी व कर्ज बाजारीपणामुळे मृत्यूला जवळ करत आहे. सरकार मायबाप शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत नाही. परिणामी तो हतबल झाला आहे. कधी तो निसर्गाच्या प्रकोपाचा बळी ठरत आहे. तर कधी तो मानव निर्मित संकटाचा सामना करतो आहे.याचे प्रत्यक्ष चित्रन देखाव्यातून बाल शेतकऱ्यांनी तान्हा पोळ्यात सादर केले.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील श्री पंढरीनाथ देवस्थान ,मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित तान्हा पोळ्यातील बाल शेतकऱ्यांचे देखाव्यातील भाष्य प्रेक्षकांना विचारमंथन करणारे ठरले आहे.बाल शेतकऱ्यांचा जागृती संदेश विचार करणारा ठरला.

मागील कित्येक वर्षांपासून श्री पंढरीनाथ देवस्थान ,मंगल कार्यालयाच्या वतीने तान्हा पोळा भरविला जातो.गावातील बैल पोळ्यापेक्षा तान्हा पोळ्याला मोठी गर्दी जमा होते.यामध्ये बाल शेतकरी आपल्या कल्पकतेतून विविध विषयांवर देखावे प्रदर्शित करतात.यावर्षीच्या तान्हा पोळ्यात बाल शेतकऱ्यांनी चंद्रमोहिमे पासून शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर भाष्य करणारे देखावे सादर केले.एका प्रकारे तान्हा पोळा म्हणजे बाल गोपाल शेतकऱ्यांची ही जत्राच होती.येथील बाल शेतकऱ्यांनी तान्हा पोळ्यात सादर देखाव्यातील भाष्य प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारे ठरले.

विसापूर येथील श्री पंढरीनाथ देवस्थानचे अध्यक्ष रामभाऊ टोंगे व व्यवस्थापिकय मंडळाचे सदस्य यांच्या मार्फत तान्हा पोळ्यात सहभागी सर्वच नंदी बैल धारक बाल शेतकऱ्यांना खेळणी,खाऊ व भेट वस्तू प्रदान करून बाल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.दरम्यान वंचित आघाडीच्या सरपंच वर्षा कुलमेथे,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले,रीना कांबळे,वैशाली पुणेकर,हर्षला टोंगे,सरोज केकति,संदीप काकडे,शिला नगराळे,माया जीवने आदींच्या वतीने सर्व नंदी बैल धारक बालकांना बिस्कीट पुडा वाटप करण्यात आला.

विसापूर पंच कमिटीतर्फे बाल शेतकऱ्यांचा सत्कार
तान्हा पोळ्यात सहभागी बाल शेतकऱ्यांनी नंदी बैल घेऊन उत्कृष्ट सजावट करून जागृती संदेश दिला.याबद्दल बाल शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस दिले.विसापूर येथील पंच कमिटीचे पदाधिकारी प्रभाकर टोंगे, सुरेश पंदीलवार्,नरेंद्र इटणकर, संदीप गौरकर,अशोक थेरे,शंकर गिरडकर,पांडुरंग साळवे,चंद्रकांत पावडे ,प्रमुख अतिथी डा.के.डी. बगडे, सरपंच वर्षा कुलमेथे,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,सुभाष भटवलकर,मुन्नालाल पुंडे यांच्या हस्ते नंदी बैल सजावट स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणारे मिश्री गणेश आस्वले, समृद्धी राजू हरणे,कार्तिक रवी हरणे,ऋषीकेश नंदकिशोर टोंगे,रोशन ताजने,उज्वल कपाटे,मयूर गोरे,माहीर अँड्रस्कर, रुद्रा इटणकर,सान्वी इंगळे आदी नंदी बैल धारक बाल शेतकऱ्यांना बक्षीस प्रदान करून गौरविण्यात आले.