Home Breaking News Ghugus city@ news • अनाथ शालेय विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७३...

Ghugus city@ news • अनाथ शालेय विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७३ वा वाढदिवस ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात उत्साहात साजरा •ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा स्तुत्य उपक्रम •सेवा ते समर्पण हिच पंतप्रधान नरेंद्र मोदीची शिकवण- विवेक बोढे

362

Ghugus city@ news
• अनाथ शालेय विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७३ वा वाढदिवस ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात उत्साहात साजरा
•ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा स्तुत्य उपक्रम
•सेवा ते समर्पण हिच पंतप्रधान नरेंद्र मोदीची शिकवण- विवेक बोढे

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, १७ सप्टेंबर रोजी भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ वा वाढदिवस अनाथ शालेय विद्यार्थ्यांसोबत सेवा पंधरवाडा म्हणून माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी,भाजपाचे निरीक्षण तांड्रा, नितु चौधरी, चिन्नाजी नलभोगा, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, हेमराज बोंबले, संजय भोंगळे, सुचिता लुटे, अमीना बेगम, मल्लेश बल्ला,हेमंत पाझारे,प्रवीण सोदारी, बबलू सातपुते,दिनेश बांगडे, हसन शेख व आबेदा पठाण मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची व जीवनाआवश्यक साहित्याची किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. लाभार्थ्यांना मोफत आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. अनाथ विद्यार्थ्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, सर्व धर्म आपणास एकच शिकवन देते ती म्हणजे सेवा होय. जिथे सेवा तिथेच ईश्वर असतो. भाजपातर्फे लोकांच्या सेवे साठी प्रत्येक कार्यक्रम घेण्यात येतो. आतापर्यंत जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला म्हणून भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो.

संचालन साजन गोहणे यांनी केले

यावेळी भाजपाचे सुरेंद्र जोगी, सचिन कोंडावार, नितीन काळे, सुरेंद्र भोंगळे, तुळशीदास ढवस, श्रीकांत बहादूर, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, पियुष भोंगळे, शाम आगदारी, दिलीप कांबळे, जयराज घोरपडे, रवी बोबडे, सुशील डांगे, डॉ.सुनील राम, राजु चौधरी,सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने, शबाना शेख, सलमा शेख, मंदेश्वर पेंदोर, श्रीनिवास येरलावार, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.