Home Breaking News Chandrapur dist@ news • विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला ओबीसी बांधवांचा विराट...

Chandrapur dist@ news • विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा ! •हजारों ओबीसी बांधव झाले मोर्चात सहभागी !

158

Chandrapur dist@ news
• विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात निघाला ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा !
•हजारों ओबीसी बांधव झाले मोर्चात सहभागी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:ओबीसी समाजाच्या विविध रास्त मागण्यांसाठी आज रविवार दि.१७ सप्टेंबरला ओबीसी बांधवांच्या वतीने चंद्रपूरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गांधी चौकातून आज दुपारी १ वाजता निघालेल्या या मोर्चात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील हजारों ओबीसी बांधव स्वयंस्फुर्तिने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने आज अनेकांचे लक्ष वेधले . मुख्य मार्गाने निघालेला हा विराट मोर्चा नंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.ओबीसी बांधवाच्या या मोर्चात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे सहभागी झाले होते .यावेळी त्यांनी ओबीसी समाजाची भावना समजून घेत त्या राज्य सरकार पर्यंत पोहचविणार असल्याचे म्हटले.

मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यांत मुला – मुलींकरीता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आमदार जोरगेवार यांनी दोन दिवसांपूर्वीच भेट दिली होती.

दरम्यान आज उपरोक्त मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार हे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह
सहभागी झाले होते. आजच्या या विराट मोर्चा दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून चंद्रपूर पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. या वेळी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी बांधवांच्या वतीने मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.