Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूरच्या छत्रपती नगरात तान्हा पोळा उत्साहात संपन्न!...

Chandrapur city@ news • चंद्रपूरच्या छत्रपती नगरात तान्हा पोळा उत्साहात संपन्न! आ. किशोर जोरगेवारांची उपस्थिती

142

Chandrapur city@ news


• चंद्रपूरच्या छत्रपती नगरात तान्हा पोळा उत्साहात संपन्न! आ. किशोर जोरगेवारांची उपस्थिती

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:बालगोपालांचा हर्षोल्लास द्विगुणित करणारा सण म्हणजे तान्हापोळा! स्थानिक छत्रपती नगर ,डी. आर.सी. रोड येथील संकट मोचन हनुमान मंदिर येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने नंदीबैल सजावट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने आयोजित स्पर्धेत नगरातील बालगोपालांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. नंदीचा चेहरा ,नंदीची सजावट, नंदीची रंगरंगोटी , नंदी वाहकाचा पोशाख व त्या निमित्ताने सामाजिक संदेश या प्रमाणे गुणांक देऊन उत्कृष्ट नंदीची निवड करून त्यांना प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रतिभा राऊत व प्रकाश झाडे यांनी जबाबदारी सांभाळली.

याप्रसंगी उपस्थित सर्वच बालगोपालांचे कौतुक करून स्पर्धेत विजयी ठरलेल्यांना स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले .उर्वरित सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर स्मृतिचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

तान्हा पोळा हा सण भारतीय संस्कृतीत फार पूर्वी पासुन सुरू असलेला एक महत्त्वाचा सण आहे. परंतू आजच्या जागतीकीकरणाच्या झपाट्यात आपल्यावर सहाजिकच पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत चालला आहे. तसे असले तरी आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची धुरा खऱ्या अर्थाने आज या बालगोपालांवर आहे.

त्यामुळे आज याठिकाणी विविध किल्याचे देखावे , शेती व शेतकऱ्यांशी संबंधित देखावे चंद्रयानचा सुद्धा देखावा आणि सजावटी करून आलेल्या बालगोपालांनी पुढेही अशाच पद्धतीने भारतीय संस्कृतीचे जतन करून प्रत्येक सणामध्ये हिरीरीने सहभाग घ्यावा असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अमित करपे, सचिन चलकलवार , राकेश नाकाडे, सचिन पोडे, विनोद एडलावार , बादल गोरलावार, पवन कन्नमवार, सुमित करपे, पुरुषोत्तम ठेंगणे, महेंद्र तिवारी, रोहित पुरमशेट्टीवार, सचिन हनुमंते , सागर वराडे , राजेश कवाडघरे, वैभव मीटकर, विपीन येलमुले, पुरुषोत्तम राव, चेतन कन्नमवार गौरीशंकर धामणकर ,मनोज मते ,अनुप गेघाटे ,अतुल रुईकर ,सुमित भोजेकर, कृपाल नाकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.