Home Breaking News Chandrapur dist@ news •साखळी उपोषणाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्ष ! •येत्या १८सप्टेंबर पासून...

Chandrapur dist@ news •साखळी उपोषणाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्ष ! •येत्या १८सप्टेंबर पासून होणार अन्नत्याग आंदोलन !

116

Chandrapur dist@ news
•साखळी उपोषणाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्ष !
•येत्या १८सप्टेंबर पासून होणार अन्नत्याग आंदोलन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मागील सहा दिवसांपासून मेजर गेट येथे पीडित कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे.

गेल्या सात वर्षांपासून नागपूरची कुणाल कंपनी महाऔष्णिक वीज केन्द्रात (तीन युनिट मध्ये) कार्यरत आहे. पण ही कंपनी त्यांच्याकडे काम करणा-या कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार देत नाही. त्यांच्या पीएफ मधील कपात झालेली रक्कम वेळेवर भरणा करत नाही. गेल्या 14 महिन्यांचा पीएफचा पैसा कंपनीने आज पर्यंत त्यांच्या खात्यात जमा केलेला नाही.तदवतचं दि. ०१,०९ ,२०२३ ला झालेल्या संघटनेच्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या मुद्द्यावर ते कायम राहीले नाही.तेव्हा पीड़ित कामगारांनी उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू केले आहे.

कुणाल कंपनीकडून कामगारांवर एव्हढा मोठा अन्याय होत असताना देखील प्रशासन आणि महाऔष्णिक वीज प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष पुरवित नाही .या वरुन असे दिसते की कुणाल कंपनीला कोणाचा तरी आशिर्वाद आहे.

कामगारांच्या साखळी उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याचे राजू झोडे यांनी सांगितले. बैठकीत ठरलेल्या प्रमाणे जर मागण्या मान्य नाही झाल्या नाही तर उद्या (दि.१८सप्टेंबर ) पासून कामगारांनी अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरहु आंदोलनात पीडित कंत्राटी कामगार अभय भाऊराव सपाट , पंढरी भिवाजी टोंगे ,आनंद रामकृष्ण पुणेकर ,उमेश दयाराम धोंगडे व राहुल रमेश तुराणकर हे सहभागी होत आहेत.

पीडित कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहील.अशी माहिती उलगुलान संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राजू झोडे यांनी आज या प्रतिनिधीस दिली. यावेळी आंदोलक रवि पवार ,श्याम झिलपे ,मंगेश बदखल ,कुणाल चौधरी ,पंचशील तामगाडगे सुमित भिमटे ,नागेश रत्नपारखी,अक्षय राऊत,अभय सपाट ,शाम चुके ,मोनू मटाले ,प्रतीक मानकर ,प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मडावी ,सुधीर डाहाकी ,आनंद पुणेकर, राजु जागने ,प्रफुल्ल पाटील व राहुल वाभले उपस्थित होते.