Home Breaking News Chandrapur city@ news • राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिलोचनसिंग अरोरा यांचा आम आदमी पार्टीत...

Chandrapur city@ news • राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिलोचनसिंग अरोरा यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश !

92

Chandrapur city@ news
• राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिलोचनसिंग अरोरा यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष त्रिलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर यांनी सरदार यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

सरदार यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून त्यांना आता पुढे जाणे शक्य नव्हते. आम आदमी पार्टीची विचारसरणी त्यांना आवडली. पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे. अरोरा (शंकर सरदार) यांचे पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अरोरा (शंकर सरदार) यांनी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव भूषणजी ढाकूलकर तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत नुकतेच आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारल्याचे वृत्त आहे.
सरदार यांनी सांगितले की, ते शरद पवार-अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. आम आदमी पार्टी एक नवीन आणि आशादायी पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरदार यांच्या प्रवेशाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला असून सरदार हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळण्याची शक्यता आहे.अरोरा (शंकर सरदार) यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी महानगर अध्यक्ष योगेश गोखरे ,संतोष दोरखंडे, दीपक बेरशेट्टीवार,राजू कुडे, सुनील सदभैय्या, सिकंदर सागोरे, संतोष बोपचे, सुधीर पाटील, तब्बसूम शेख, पवन कुमार, जितेंद्र कुमार भाटिया अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.