Home Breaking News ◻️🔸गंध मधुर भरला◻️🔸 ◻️🔹वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

◻️🔸गंध मधुर भरला◻️🔸 ◻️🔹वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

232

◻️🔸गंध मधुर भरला◻️🔸

◻️🔹वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

🟧🔸येता गणराया घरी
गंध मधुर भरला,
स्वागतास गणेशाच्या
रंग लाल उधळला.(१)

🟧🔸केली छान सजावट
रांगोळीने पुढे दारी,
माळ फुलांनी वाढली
मखराची शोभा न्यारी.(२)

🟧🔸ढोल ताश्यांच्या वाद्यात
आगमन श्रीचे झाले,
प्रत्येकाच्या आनंदाला
जणू उधाणच आले.(३)

🟧🔸सुगंधित पुष्पे छान
बाप्पा चरणी वाहिली,
भक्तिगीत आरतीने
पुष्पांजली ही अर्पिली.(४)

🟧🔸लाडू मोदक नैवद्य
प्रसादास बनविले,
चरणात तुझ्या राया
शिर आम्ही झुकविले.(५)

🟧🔸हेच राहील मागणे
गणराया गणेश्र्वर,
सर्व तुझीच लेकरे
तूच आम्हा सर्वेश्वर.(६)