Home Breaking News Chandrapur dist# news •अन्नत्याग आंदोलन करणा-या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना धमकावणे सुरू...

Chandrapur dist# news •अन्नत्याग आंदोलन करणा-या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना धमकावणे सुरू राजू झोडेंचा आरोप! • दुर्गापुर पोलिसांकडे तक्रार दाखल •कुणाल कंपनीवर गुन्हा दाखल होणार कि नाही ?

73

Chandrapur dist# news
•अन्नत्याग आंदोलन करणा-या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना धमकावणे सुरू राजू झोडेंचा आरोप!
•दुर्गापुर पोलिसांकडे तक्रार दाखल
•कुणाल कंपनीवर गुन्हा दाखल होणार कि नाही ?

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:गेल्या आठ दिवसांपासून वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी कुणाल कंपणीविरोधात आंदोलन सुरू केले असून सहा दिवस साखळी उपोषण केल्यानंतर दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन आरंभ केले आहे.परंतु वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीने अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने कामगार उपोषण सुरू ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.अशातच कुणाल कंपनीचे अधिकारी व वीज केंद्रातील अधिकारी उपोषणावर बसलेल्या कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्यांना रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा घालून धमकावणे सुरू केल्याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिली आहे.

वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत केले असून कामगारांना काढून टाकण्याची धमकी सुद्धा दिली जात असल्याचा आरोप झोडे यांनी केला आहे. याप्रकरणी दुर्गापुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई न केल्याने कामगार वर्गात रोष व्यक्त केल्या जात आहे.

कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कपात केल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते.याविरोधात मेजर गेट समोर हे साखळी उपोषण सुरू होते.मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने सोमवार पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे .अशातच कुणाल कंपनीचे अधिकारी व वीज केंद्रातील अधिकारी उपोषणावर बसलेल्या कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्यांना रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा घालून धमकावणे सुरू केल्याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिली आहे.

याप्रकरणी दुर्गापुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र दुर्गापुर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसुन आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.आंदोलन स्थळी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे ,रवि पवार अन्नत्याग आंदोलक पंढरी टोंगे आंनद पुणेकर, राहुल तुराणकर, अभय सपाट, आशीष ठेगणे सोबतच उलगुलान कामगार आंदोलक मंगेश बदकल, कुणाल चौधरी ,सुमित भिमटे अक्षय राऊत ,सुधीर डाहाकी अक्षय काकडे ,राहुल वाभले ,राजु जागने प्रफुल्ल पाटिल आदिं उपस्थित होते.