Home Breaking News Ghugus city@ news • सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात...

Ghugus city@ news • सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

220

Ghugus city@ news
• सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर :- घुग्गुस येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाग यांनी आज आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

घुग्गुस येथील अनेक सामाजिक प्रश्न घेऊन सर्वसामान्य नागरिकांकरिता आंदोलनाची भूमिका घेणारे बाग यांनी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात प्रवेश घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घुग्गुस शहर अध्यक्ष ऋतिक मडावी, कामगार संघटनेचे संजय सेजूळ, व्हीजेएनटी सेलचे घुग्गुस शहराध्यक्ष योहान इरुगूराला, गणेश बावणे, पियुष चांदेकर, निखिल मेश्राम उपस्थित होते.

महेंद्र बाग यांचेसह जमाल शेख, किशोर कुलियन, सोनू कोलगुर, जगन नाईक, गणेश देशकर, निखिल आसेकर, सामराज बेलामपेल्ली, राकेश रॉय, कृष्णा देवेंपल्ली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.