Home Breaking News Jivti taluka @news • विविध रास्त मागण्यांसाठी- भर पावसात धडकला जिवती तहसील...

Jivti taluka @news • विविध रास्त मागण्यांसाठी- भर पावसात धडकला जिवती तहसील कार्यालयावर शेतक-यांचा ज‌नआक्रोश मोर्चा

104

Jivti taluka @news
• विविध रास्त मागण्यांसाठी- भर पावसात धडकला जिवती तहसील कार्यालयावर शेतक-यांचा ज‌नआक्रोश मोर्चा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

जिवती(चंद्रपूर)-भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी जिवती तालुका विकासापासून कोसो दूर आहे. हा तालुका अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेला असून आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग म्हणून अख्ख्या विदर्भात ओळखला जातो. सदरहु तालुक्यात मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, या जिल्ह्यातून दुष्काळाच्या काळात (सन 1955 ला ) लोक आले माणिकगड पहाडावर वन जमिनीवर अतिक्रमण करून जंगल तोडून त्यांनी शेती केली .याच शेतीच्या भरोश्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतोय . सध्या परिस्थितीत त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. दरम्यान जिवती तालुक्यातील 90% शेती ही कोरडवाहू असल्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. याच तालुक्यातील 70% टक्के शेतकरी बांधवांना आतापर्यंत त्यांच्या शेतीचे व हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही .या शिवाय त्यांना घराचे देखील पट्टे मिळाले नाही.त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.या काही प्रमुख मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी व मुख्यता या कडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवार दि.२१सप्टेंबरला भर पावसात त्यांनी भव्य जनआक्रोश मोर्चा काढला.शासनाने त्यांच्या मागण्या संदर्भात दखल घ्यावी यासाठी त्यांनी जिवत़ी तहसिलदार यांच्या मार्फत शासनाला एक लेखी निवेदन दिले
◼️-मागण्या अश्या -◼️
1) तीन पिढ्याची अट रद्द करून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे द्या.
2) जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यात यावे.
3) जिवती येथे न्यायालय सुरु करा.
4) जिवती येथे बसस्थानक तात्काळ मंजूर करा.
5) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची निधी तात्काळ जमा करण्यात यावे.
6) नगरपंचायत जिवती येथे मंजूर असलेले रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे.
7) जिवती तालुक्याच्या विकास कामासाठी लागणारी वनविभागाची विविध (NOC) ची अटी रद्द करा.
8) जिवती येथे भारतीय स्टेट बँक शाखा तात्काळ मंजूर करा.
9) नगरपंचायत जिवती येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर असलेले 664 घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी तात्काळ देण्यात यावी.
10) जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्वे करून देण्यात यावे.
11) जिवती तालुक्यातील सर्व गाव व तांड्यामध्ये सर्वे करून गावठाणा वाढवून तात्काळ देण्यात यावे.शेतकरी जनहिताच्या विविध मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात शेतकरी संघटनेचे माजी आ. वामनराव चटप निळकंठ कोरांगे ,सय्यद शब्बीर जागीरदार,सुदाम राठोड,सय्यद इस्माईल ,विनोद पवार, मधुकर चिंचोलकर, नरसिंग हामणे, विशाल राठोड, सय्यद इस्माईलभाई, गणेश कदम, रामेश्वर नामपल्ले, उध्दव गोतावळे, लक्ष्मण पवार, नामदेव राठोड, कर्मराज कांबळे, सुनील बावणे, मिथुन चव्हाण, अमोल चव्हाण, रवींद्र राठोड, कपिल जाधव, अंबादास चव्हाण, देवला चव्हाण, रमेश पवार, व्यंकटी जाधव, प्रकाश राठोड,बालाजी बनसोडे,रघुनाथ पोले तसेच शेतकरी संघटना , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व शेतकरी बांधव शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.