Home Breaking News Bramhpuri taluka@ news •हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली 10 वर्षाची...

Bramhpuri taluka@ news •हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली 10 वर्षाची कारावासाची शिक्षा

91

Bramhpuri taluka@ news
•हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने
ठोठावली 10 वर्षाची कारावासाची शिक्षा

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

ब्रम्हपुरी:पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी हद्दीतील बेलादाठी येथे आरोपीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन्ही
मुलांना शेतात जातो म्हणून घरून निघून गेली नंतर तिने मालडोंगरी शेत शिवारातील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली.

तिचे लग्न आरोपी रवींद्र सोबत सन २००८ मध्ये झाले.लग्नानंतर आरोपी काही दिवस चांगला राहिला. त्यानंतर त्याला दारू पिण्याची सवय जडली.तो मृतकाकडे सतत पैशाची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास झगडा भांडण करुन
तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

पोलीस शहर ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक 17/2022 कलम – 498 (अ ),306 भा. द.वी. अन्वये आरोपी नामे रवींद्र मुरलीधर पारधी वय 42 वर्ष राहणार मालाडोंगरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात सुनावणी दरम्यान भालचंद्र जिल्हा व सत्र न्यायाधीश – 2 चंद्रपूर यांनी या प्रकरणातील साक्षीदार तपासले व योग्य पुरावाच्या आधारे दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी आरोपी रवींद्र पारधी यास कलम 498 (अ )भादवी मध्ये ३ वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.

दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा या शिवाय कलम 306 भादवी. मध्ये१० वर्ष शिक्षा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा (कलम 235 (2) सीआरपीसी नुसार) ठोठावली आहे.

सदरहु गुन्ह्याचा तपास मिलिंद लिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी केला होता तर सरकार तर्फे अधिवक्ता संदीप नागपुरे चंद्रपूर,कोर्ट पैरवी म्हणून पोहवा. रामदास कोरे/414, नापोअ.विजय ब्राह्मणे/2119 पो.स्टे.
ब्रम्हपुरी यांनी काम पाहिले