Home Breaking News Chandrapur city@ news • रविंद्र टोंगेंचे चंद्रपूरात अन्नत्याग आंदोलन सुरुच ! ...

Chandrapur city@ news • रविंद्र टोंगेंचे चंद्रपूरात अन्नत्याग आंदोलन सुरुच ! •शासनाने अद्याप घेतली नाही आंदोलनाची दखल!

51

Chandrapur city@ news
• रविंद्र टोंगेंचे चंद्रपूरात अन्नत्याग आंदोलन सुरुच !
•शासनाने अद्याप घेतली नाही आंदोलनाची दखल!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा १२वा दिवस आहे.दरम्यान या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतली नाही.या आंदोलनस्थळी अनेकांनी भेटी देत आपला पाठिंबा दिला आहे.ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून काल भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरीता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी अश्या या प्रमुख मागण्या असून या रास्त मागण्यांच्या पूर्तेते साठी टोंगे यांनी आंदोलन आरंभ केले आहे.काल गुरुवारला दुपारी आंदोलन स्थळी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची सहानुभूतीने विचारपूस करीत त्यांचेशी चर्चा केली . यावेळी सचिन राजूरकर उपस्थित होते.

ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे. शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील. याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली उपस्थित होते.