Home Breaking News ◻️🏵️ज्येष्ठा गौराई🏵️◻️ ♦️◻️सौ.वंदना अजय आगलावे (बोढे) सहज सुचलं सदस्य...

◻️🏵️ज्येष्ठा गौराई🏵️◻️ ♦️◻️सौ.वंदना अजय आगलावे (बोढे) सहज सुचलं सदस्य भद्रावती जिल्हा-चंद्रपूर

190

◻️🏵️ज्येष्ठा गौराई🏵️◻️

♦️◻️सौ.वंदना अजय आगलावे (बोढे) सहज सुचलं सदस्य भद्रावती जिल्हा-चंद्रपूर

सोनियाच्या पावलाने झाले
ज्येष्ठा गौरींचे आगमन
मनोभावे स्वागत करिती
थाटामाटात सोहळा पूजन..

तुझ्या ग येण्याने
आनंदाला नाही सीमा
सतेज कांती चेहऱ्यावरती
शोभून दिसतो पती उमा…

सौभाग्यवती भरती ओटी
रक्षिण्या अपुल्या परिवारास
सुख समृद्धी लेकरां साठी
मागिते दान गौराईस….

सोळा भाज्या सोळा करंज्या
असा नैवेद्य सुग्रास
सजविती ताट पांचामृतासह
आंबिल तुझासाठी खास…

अडीच दिवसाची पाहुणी बनून
ज्येष्ठा गौराई येते माहेराला
आवडीचा पाहुणचार घेऊन
समाधानाने जाते सासुरवाडीला….

प्रसन्न चेहरा रूप देखणे
हर्षिते मन तुझ्या दर्शनाने
तुझ्या शुभआशीर्वादासाठी
करीते प्रार्थना शुध्दमनाने…..