Home Breaking News Chandrapur dist@ news • विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे होत असलेली जिवीत हाणीच्या...

Chandrapur dist@ news • विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे होत असलेली जिवीत हाणीच्या दुर्घटना टाळण्याबाबत आवाहण

145

Chandrapur dist@ news
• विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे होत असलेली जिवीत हाणीच्या दुर्घटना टाळण्याबाबत आवाहण

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात शेतकऱ्यांमार्फत जंगली प्राण्यांपासून शेती व पिकांच्या संरक्षणार्थ त्यांच्या शेती कुंपणास अवैध विद्युत तारेची जोडणी करुन विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वत: शेत मालकास विनाकारण आपले जिव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात सन २०२२ ते माहे ऑगष्ट २०२३ पावेतो एकुण १३ प्रकरणांची नोंद असुन ज्यात शेत मालकाच्या अवैध विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे एकुण १३ इसमांचा दुख:द मृत्यु झालेला आहे.

अशा प्रकरणात संबंधीत विद्युत प्रवाह सोडणाऱ्या शेत मालकांविरुध्द कलम ३०४ भा. दं. वि. प्रमाणे “सदोष मनुष्य वध गुन्हयाचे १२ गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन ज्यात आजन्म कारावासाची सुध्दा शिक्षा होवु शकते.

अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुध्दा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहण केले की, जंगली प्राण्यापासुन शेती व पिकाची सुरक्षिततेकरीता शेती कुंपणाला विद्युत प्रवाह तार जोडुन जिवंत विद्युत प्रवाह सोडु नये, अन्यथा संबंधीताविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात व प्रवाह सोडू नये, अन्यथा संबंधीताविरुध्द कठोर व येईल.