Home Breaking News Ghadchiroli dist@ news •शालेय विद्यार्थ्यांना सायकल तर दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वाटप...

Ghadchiroli dist@ news •शालेय विद्यार्थ्यांना सायकल तर दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वाटप •माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार •गणेश भक्तांची आस्थेने विचारपूर करत महाप्रसाद वितरण

125

Ghadchiroli dist@ news
•शालेय विद्यार्थ्यांना सायकल तर दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वाटप

•माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

•गणेश भक्तांची आस्थेने विचारपूर करत महाप्रसाद वितरण

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

अहेरी: टायगर ग्रुप श्री गणेश महोत्सव समिती अल्लापल्ली तर्फे क्रीडा संकुल परिसरात गणेश उत्सव साजरा केला जात आहे.या उत्सवात दररोज विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून २३ सप्टेंबर रोजी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना सायकल,दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल तसेच महाप्रसाद वितरण करण्यात आले.

भाग्यश्री आत्राम नेहमीच सामाजिक उपक्रमात हिरीहीरीने सहभागी होतात.टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ताईंनी शालेय विद्यार्थ्यांना सायकल,दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल आणि भाविकांना महाप्रसाद वितरण करण्याचे ठरविले होते.२३ सप्टेंबर रोजी ताईंनी सायंकाळच्या सुमारास आरतीला उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.लगेच त्यांच्याहस्ते दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना सायकल,दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप करून उपस्थित हजारो गणेश भक्तांची आस्थेने विचारपूस करत महाप्रसाद वितरण केले.

टायगर ग्रुप श्री गणेश महोत्सव समिती अल्लापल्ली तर्फे पहिल्यांदाच क्रीडा संकुल आवारात गणेश उत्सव साजरा केला जात आहे.याठिकाणी मेला लागल्याने नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे येथील भव्य केदारनाथ देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठी गर्दी बघायला मिळाली.भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित हजारो गणेश भक्तांची आस्थेने संवाद साधत महाप्रसाद वितरण केले.

यावेळी आलापल्लीचे प्रथम नागरिक शंकर मेश्राम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,ग्रा प सदस्य मनोज बोल्लूवार, ग्रा.प.सदस्य सोमेश्वर रामटेके,ग्रा.प.सदस्य अनुसया सप्पीडवार,पेद्दीवार आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.