Home Breaking News Chandrapur city@ news • येत्या २६ सप्टेंबरला चंद्रपूरात “दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन!...

Chandrapur city@ news • येत्या २६ सप्टेंबरला चंद्रपूरात “दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन! • दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे महेश हजारेंचे आवहान

77

Chandrapur city@ news
• येत्या २६ सप्टेंबरला चंद्रपूरात “दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन!
• दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे महेश हजारेंचे आवहान

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:जनसामान्यांचा आधार अन् सेवेचा वारकरी म्हणून अख्ख्या विदर्भात ओळख असणारे आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २६ सप्टेंबरला स्थानिक शकुंतला लाॅन येथे दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर प्रहारचे महेश हजारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून आज केले आहे.
देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय आ.बच्चू कडु यांच्या अथक प्रयत्नातून आणि संघर्षातून महाराष्ट्रात स्थापन झाले आहे.
महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग बांधव शासनाच्या विविध योजनेपासून आणि अधिकारापासुन वंचित आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळवुन देण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम आ.बच्चू कडु हे राबवित आहेत . आयोजित कार्यक्रमाला सर्व शासकिय यंत्रणा येथे उपस्थित राहणार असून दिव्यांग बांधवाच्या सर्व समस्या लेखीस्वरुपात आ.बच्चू कडु स्वता स्विकारणार आहे.

येणार्‍या काळात दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणुन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रत्येक योजनेचा लाभ पारदर्शकपने दिव्यांगाना मिळावा एव्हढेच नाही तर शासकिय यंत्रणा सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम आपण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात राबवित आहोत असे आ.बच्चू कडु यांनी म्हटले आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात अंदाजे सतरा हजार दिव्यांग बांधव आहेत. यात हजारों दिव्यांग बांधव विविध शासकीय योजनेपासून वंचित आहेत .अनेकांना आतापर्यंत कुठलाच शासकिय लाभ मिळाला नाही. दिव्यांगाप्रती उदासिन असणार्‍या चंद्रपुर प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व वंचित दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येत्या मंगळवारी कल्याण विभाग दिव्यागांच्या दारी हे अभियान चंद्रपूरात होत आहे.

आ.बच्चू कडु हे प्रत्यक्षात हजारों दिव्यांगाच्या व्यथा या आयोजित कार्यक्रमात ऐकूण घेणार असल्याचे महेश हजारे यांनी या प्रतिनिधीस सांगितले. मंगळवारला होत असलेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहावे असे आवाहन हजारे यांनी केले आहे.