Home Breaking News Gadchiroli Dist News • भामरागड तालुका शिवसेना (ऊबाठा गटाचे)पक्षाचे सर्व पदाधिकारी रा....

Gadchiroli Dist News • भामरागड तालुका शिवसेना (ऊबाठा गटाचे)पक्षाचे सर्व पदाधिकारी रा. काँत प्रवेश! • राष्ट्रवादीचे रियाज शेख यांच्या नेतृत्वात मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी दुपट्टा टाकून स्वागत केले

22

Gadchiroli Dist News
• भामरागड तालुका शिवसेना (ऊबाठा गटाचे)पक्षाचे सर्व पदाधिकारी रा. काँत प्रवेश!
• राष्ट्रवादीचे रियाज शेख यांच्या नेतृत्वात मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी दुपट्टा टाकून स्वागत केले

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

अहेरी: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहेरी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण आदी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आलापल्ली येथील क्रीडा संकुल च्या भव्य पटांगणात जाहीर प्रवेश केले.
रियाज शेख यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करताच लगेचच त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष पद बहाल करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रियाज शेख यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक शुक्रवारी सायंकाळी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले. मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून स्वागत केले व सर्वांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या मध्ये शिवसेनेचे भामरागड तालुकाध्यक्ष खुशाल मडावी, नगर सेवक गजानन उईकें , शहर प्रमुख व्येंकटी ईष्टाम, महिला आघाडी तालुका प्रमुख निर्मला सडमेक, जनाबाई सडमेक, उर्मिला मडावी, संपत मडावी, मोतीराम मडावी, सुमित्रा वेलादी, ताराबाई मडावी, वच्छाला टेकाम, अक्षत मंडल, अनिल कुळमेथे, शाहनवाज पठाण, दशरथ सडमेक, दुगा विडपी, स्वप्नील गावडे, रवींद्र उईके, हरीश मडावी, धर्मेंद्र उईके, अरुण मडावी, ईश्वर मडावी, उमेश वेलादी, सुरेश जुंबडे, अंबादास मडावी, लव कन्नाके, जयराम पोरतेट, बाळु उईके आदी व असंख्य शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले.
पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भामरागड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.