Home Breaking News Chandrapur city@ newd •एक अभिनव कार्यक्रम •कौटुंबिक...

Chandrapur city@ newd •एक अभिनव कार्यक्रम •कौटुंबिक सुसंवाद -यशोगाथा सहजीवनाची !

115

Chandrapur city@ newd
•एक अभिनव कार्यक्रम
•कौटुंबिक सुसंवाद -यशोगाथा सहजीवनाची !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: मराठा सेवा संघ चंद्रपूर द्वारा एका नवीन उपक्रमाला सुरूवात झाली. तो उपक्रम – म्हणजे कौटुंबिक सुसंवाद – यशोगाथा सहजीवनाची हा आहे. या उपक्रमात एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबावर केलेले संस्कार, त्या संस्कारातून झालेली प्रगती,शिक्षण-व्यवसाय यातून त्याच्या कुटुंबात झालेले बदल या सर्व कौटुंबिक प्रवासाचा उजाळा करणे!सदरहु सुसंवाद कार्यक्रमातून इतर कुटुंबाला त्यांना त्यांचे जीवन जगतांना आलेल्या समस्येतून बाहेर कसे पडता येईल हाच एक प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून मराठा सेवा संघ राबवित आहे .व तो उपक्रम दरवर्षी राबविणार आहे.
नुकताच कौटुंबिक सुसंवाद – यशोगाथा सहजीवनाची हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता . पहिल्याच कार्यक्रमाचे मानकरी ठरले ते प्रा. बबनराव राजुरकर आणि शिवमती रजनी राजुरकर दांम्पत्य !यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली .ही मुलाखत शिवश्री शंकरराव लोनगाडगे व शिवमती प्रितमा परकारे यांनी घेतली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राजुरकर दांम्पत्यांना त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, विवाह, नोकरी शैक्षणिक व सामाजीक कार्य या सर्व मुद्यांवर प्रश्न विचारली त्यांनी देखील या सर्व प्रश्नांची उत्तरे समर्पक दिली .याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजुरकर दांपत्यांनी आपल्या जीवन प्रवासातील संपूर्ण आढावा उपस्थितीतां समोर मांडला. या कुटुंबातील अत्यंत महत्वाची बाब ठरली ती म्हणजे त्यांनी आपली मुले-मुली व भावंडाची मुले-मुली यासह पाच जणांना त्यांनी डॉक्टर बनविले. हे एक सुसंस्कारीत कुटुंबाचे लक्षणे आहे .त्यानंतर उपस्थित लोकांशी संवाद साधून त्यांना असलेल्या प्रश्नांची उकल त्यांनी यावेळी करून दिली.
राजुरकर कुटुंबानी आपले कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटविला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या कुटुंबातर्फे मराठा सेवा संघाद्वारे छ. शाहू महाराज जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा घेतला जातो. त्या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सन्मान चिन्हाचा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलतात ही परंपरा ते कायम ठेवणार आहे.
मुलाखती नंतर प्रा. बबनराव राजुरकर आणि शिवमती रजनी राजुरकर यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. दिपक खामनकर, जिल्हा सचिव सुरेश माळवे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा वनिता आसुटकर यांच्या हस्ते सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच प्रितमा
परकारे व दिलीप परकारे यांचा संजय बोटरे व प्रणिती बोटरे यांच्या हस्ते सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला अनेक मंडळी उपस्थित होती.
मराठा सेवा संघ ,सर्व कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.