Home Breaking News Chandrapur dist@ news •सावलीचे विस्तार अधिकारी अडकले ACB च्या जाळ्यात ...

Chandrapur dist@ news •सावलीचे विस्तार अधिकारी अडकले ACB च्या जाळ्यात चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

339

Chandrapur dist@ news
•सावलीचे विस्तार अधिकारी अडकले ACB च्या जाळ्यात
चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर :- जिल्ह्यातील सावली येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण), अतिरिक्त कार्यभार गटशिक्षणाधिकारी, लोकनाथ जैराम खंडारे यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
तक्रारदार हे मुल येथील रहीवासी असून ते प्राथ. शिक्षक या पदावर कार्यरत असुन त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते सहा महिने वैद्यकीय रजेवर होते. तक्रारदार यांचे सहा महिन्याच्या वैद्यकीय रजा मंजूर नसल्याने त्यांचे सदरहु कालावधी दरम्यान त्यांना वेतन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी सदर कालावधी मधील त्यांचे वैद्यकीय रजा मंजूरी करीता रितसर पंचायत समिती सावली येथे अर्ज केले. सदरहु रजा मंजूर करण्याकरीता विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दि. २५सप्टेंबरला करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकनाथ जैराम खंडारे, विस्तार अधिकारी (शिक्षण), अतिरिक्त कार्यभार गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सावली जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती ८,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकनाथ जैराम खंडारे यांनी
तक्रारदाराकडून ८,०००/-रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून दि. २७सप्टेंबरला पो.स्टे. सावली, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई ही राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी किया त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.