Home Breaking News Bhadrawati taluka@news • क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या बसवर कारवाई का होत नाही:प्रविण...

Bhadrawati taluka@news • क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या बसवर कारवाई का होत नाही:प्रविण चिमुरकर •महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कामावर लोकांचे प्रश्न

66

Bhadrawati taluka@news
• क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या बसवर कारवाई का होत नाही:प्रविण चिमुरकर

•महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कामावर लोकांचे प्रश्न

✍️मनोज मोडक
तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : सध्या सनउत्सवाचा काळ सुरू आहे. त्यामुळे जनता हि येजा करण्यासाठी आवडीच्या लाल परीची निवड करतात. परंतु याच लाल परी ची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एस.टी. महामंडळ क्षमतेपेक्षा अधिक प्रवास्यांना घेवुन सर्रास प्रवास करताना दिसत आहे. कधी कधी प्रवासी एवढे बसवितात की, बसचा दरवाजा ही लागत नाही. कॅबीन पासुन तर आखरी टोकापर्यंत प्रवासी जीव मुठीत घेवुन प्रवास करतात. एखादा अपघात झालाच तर याची जबाबदारी घेणार कोण?

एकीकडे खाजगी प्रवासी वाहनात एक सीट जास्त बसवली असता परिवहन विभागाकडून सुरक्षेच्या नावाखाली मोठा दंड वसुल केल्या जातो. मग हाच नियम महामंडळांच्या बसेस ला लागु का नाही? गाडीच्या क्षमतेपेक्षा इतक्या जास्त प्रमाणात प्रवासी नेण्याची हिम्मत एस.टी. महामंडळाला आली कुठुन? खेडे गावाकडे एस.टी बस चे पत्रे बाहेर निघुन हलतात, खिडक्यांना काच नसतो, खिडक्या दरवाजे तुटलेले असतात. तरि अश्या बसला फिटनेस प्रमाणपत्र कसे दिले जाते? यातुन परिवहन मंडळ अधिकारी सुद्धा डोळे बंद करून सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसते. हेच जर एखाद्या खाजगी सेवा देणाऱ्या बसची व्यवस्था असती तर तुरंत कारवाई करत मोठा दंड वसुल केला असता. मग तसाच दंड महामंडळ कडुन का वसुल केला जात नाही.

सरकारकडून महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना प्रवासा करिता एस.टी. ने प्रवास केल्यास प्रवासी भाड्यात सुट मिळते. त्यामुळे एस.टी. ही प्रवास करण्यासाठी सर्वांची आवडती आहे. परंतु लोकसंख्येनुसार जसी प्रवास्यांची संख्या वाढली तसी एस.टी. बस ची संख्या का वाढवली जात नाही. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना रोज शाळा, कॉलेज, कार्यालयात येजा करण्यासाठी वेळेवर बस येत नसल्याच्या, बसमध्ये विद्यार्थ्याना जागाच मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. डोळ्यासमोर सर्व चित्र स्पष्ट दिसत असुन या समस्येकडे कोणाचे लक्ष कसे का जात नाही. नागरिक सुद्धा पैसे देऊन सेवा घेतात मग सेवेमध्ये त्रुटी असल्यास आवाज का उठवला जात नाही. लोकांची अन्याय सहन करायची क्षमता इतकी जास्त वाढली आहे की जीव गेला तरी अन्याय, फसवणूक झाल्यास आवाज उचलणार नाही.

“एस.टी. ने प्रवास करणाऱ्या सर्व ग्राहकांनी जागृक राहुन महामंडळाला यासंबंधी प्रश्न विचारायला हवे. पैसे देऊन सेवा विकत घेतो त्यामुळे बस स्वच्छ असने, तिकीट काढल्यामुळे त्याला सिट मिळलाची पाहीजे, प्रवास करत असलेली बस फीट नसेल तर त्याची तक्रार बसमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबरवर करावी. ग्राहकांकडून जर आवाज उठवला गेला तर यावर नक्की कारवाई होईल. ग्राहकांनो जागृक व्हा, तुमचा एक आवाज ही परिस्थिती बदलवु शकते”.
प्रविण चिमुरकर
जिल्हा उपाध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंद्रपूर