Home Breaking News Chandrapur city@ news •अष्टभुजा मंदिराजवळ दुर्घटना ३ ठार झाल्याची प्राथमिक...

Chandrapur city@ news •अष्टभुजा मंदिराजवळ दुर्घटना ३ ठार झाल्याची प्राथमिक माहिती ३ गंभीर

707

Chandrapur city@ news
•अष्टभुजा मंदिराजवळ दुर्घटना ३ ठार झाल्याची प्राथमिक माहिती ३ गंभीर

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

चंद्रपूर:- चंद्रपूर राजुरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अष्टभुजा मंदिराजवळील गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो ह्या ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर तिन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू आहे.