Bhadrawati taluka@news
•विवेकानंद महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती
भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागात नुकतीच मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत घुमे होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश पारेलवार आणि इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक सत्रासाठी मराठी वाङ्मय मंडळाची कार्यकारिणी तयार करण्यात आली. अध्यक्ष- प्रथम पंडिले, उपाध्यक्ष- सुहानी हेपट, आचल पाटील, सचिव- गणेश मडावी, सहसचिव – स्वप्निल नन्नावरे, कोषाध्यक्ष- प्रियंका जिवतोडे , कार्यकारी सदस्य म्हणून वैशाली जिवतोडे,ज्योत्सना बारेकर, श्रुती कामतवर, सीमा पाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे संचालन प्रियंका जिवतोडे, आभारप्रदर्शन श्रुती कामतवार यांनी मानले. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या सभेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
