Home Breaking News Chandrapur dist@ news •अनुसूचित जातीमधील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लवकर...

Chandrapur dist@ news •अनुसूचित जातीमधील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लवकर द्या हो – उलगुलान संघटनेचे •राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

87

Chandrapur dist@ news
•अनुसूचित जातीमधील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लवकर द्या हो – उलगुलान संघटनेचे •राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधीछात्रवृत्ति BANRF शैक्षणिक वर्ष 2022 या योजनेचे पत्रताधारक संशोधक विद्यार्थी असून त्यांना शासनाच्या नाकर्तेपणामुळे अधीछात्रवृत्ति पासून वंचित ठेवण्यात आले आहे. याउलट याच विभागाअंतर्गत येत असलेल्या सारथी आणि महाज्योति आणि आदिवासी विकास विभागातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात आली आहे.हा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय असून सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती तात्काळ द्या हो अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.तश्या आशयाचे एक पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले असल्याचे राजू झोडे यांनी आज या प्रतिनिधीला सांगितले.

शासनाने विद्यार्थ्यां सोबत जातीवाद केला असून जाणीवपूर्वक या योजनेच्या लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा घाट रचला जात आहे. महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात असे घडणे अतिशय निंदनीय बाब असून सामाजिक न्याय विभागानेच विद्यार्थ्यांवर अन्याय केला असून तात्काळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी राजू झोडे, श्याम झिलपे, प्रफुल्ल मेश्राम यांनी केली आहे.