Home Breaking News Chandrapur dist @news • उपमुख्यमंत्री फडणवीस आले अन् ओबीसींचे उपोषण सुटले! •...

Chandrapur dist @news • उपमुख्यमंत्री फडणवीस आले अन् ओबीसींचे उपोषण सुटले! • उपोषण सुटताच चंद्रपूरात ‘जय ओबीसी’चे नारे गुंजले! • ओबीसीं बांधवांच्या प्रयत्नाला आले अखेर यश!

232

Chandrapur dist @news
• उपमुख्यमंत्री फडणवीस आले अन् ओबीसींचे उपोषण सुटले!
• उपोषण सुटताच चंद्रपूरात ‘जय ओबीसी’चे नारे गुंजले!
• ओबीसीं बांधवांच्या प्रयत्नाला आले अखेर यश!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू होते. दरम्यान काल दि.२९सप्टेंबरला मुंबईतील सह्यांद्री अतिथिगृहावर ओबीसींचे एक शिष्टमंडळ व शासनकर्त्यांत सविस्तर झाली चर्चेनंतर आज शनिवारला सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपुरात दाखल झाले व त्यांनी आंदोलनकर्त्यांना लिंबू सरबत पाजून त्यांचे गत काही दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडविले.

ओबीसींच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. उपोषण सुटताच मंडप परिसरात ‘जय ओबीसी’ चे नारे लावण्यात आले. ओबीसींची जाती निहाय जनगणना करावी, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, ओबीसीची ७२ वसतिगृह तातडीने सुरू करावी, स्वाधार योजनेची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी ओबीसी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे गेल्या ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनास बसले होते.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे जिल्ह्याभरातून प्रतिसाद मिळाला.या शिवाय रास्त मागण्यां पदरात पाडून घेण्यासाठी चंद्रपुरात ओबीसी महामोर्चा काढण्यात आला, मुंडण व भिकमांगो आंदोलन देखिल करण्यात आले होते. इतकेच नाही तर संतप्त ओबीसींनी चंद्रपूर-नागपूर हा महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध प्रकारचे आंदोलन करूनही शासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चंद्रपुरातील नेत्यांच्या घरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली होती हे सर्वश्रूतच आहे.

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची आंदोलनकर्त्यांना विनंती केली होती. पण त्यांची ही शिष्टाई कामी आली नाही. टोंगेंची तब्येत बिघडल्यानंतर इतर दोघांनी परत अन्नत्याग आंदोलनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता व त्यांनी आंदोलनाला सुरुवात देखील केली होती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत ओबीसी आंदोलनाच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे सांगितले होते.
ओबीसींच्या विविध समस्यां संदर्भात काल दि. २९सप्टेंबरला सरकार व ओबीसींच्या प्रतिनिधींची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच चंद्रपुरात दाखल झाले. मुंबईत झालेल्या चर्चेनुसार ओबीसींच्या विविध मागण्या मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार कुठल्याही स्थितीत मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण देणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज व ओबीसी समाजात कुठलाही वाद होणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तीकुमार भांगडीया व अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. याच वेळी अन्नत्याग करणा-या रवींद्र टोंगे व त्यांच्या दोन सहका-यांना लिंबू सरबत पाजून फडणवीस यांनी त्यांचे उपोषण सोडविले.