Home Breaking News Nagpur city@ news •नागपूरात पार पडला संताजी ब्रिगेड तेली महासभेचा समाज...

Nagpur city@ news •नागपूरात पार पडला संताजी ब्रिगेड तेली महासभेचा समाज भूषण पुरस्कार समारंभ! •अनेक मान्यवरांची उपस्थिती !

313

Nagpur city@ news
•नागपूरात पार पडला संताजी ब्रिगेड तेली महासभेचा समाज भूषण पुरस्कार समारंभ!
•अनेक मान्यवरांची उपस्थिती !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नागपुर:संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा व संताजी औद्योगिक मंच तर्फे नागपूरात नुकताच समाज भूषण पुरस्कार समारंभ थाटात व उत्साहात पार पडला
या कार्यक्रमाचे आयोजक अजय धोपटे व सहआयोजक अजय कांबळे हे होते. आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महसूल विभागाच्या अपर आयुक्त डॉ.माधवी खोडे -चवरे व गुन्हे शाखा नागपूरचे अप्पर आयुक्त संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

।सदरहु समारंभात महाराष्ट्र लोकसेवा आयोग mpsc परीक्षा उत्तीर्ण अंकिता नाराळे , क्रीडा क्षेत्रातील गोल्ड मेडल प्राप्त इशिका अंतूरकर,व चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण पायल तळेकर यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे सन्मान पत्र, संताजी जगनाडे महाराजांचे स्मृती चिन्ह आणि रोख 5000 रुपये (प्रत्येकी )देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.समारंभाला नियुरोन हॉस्पिटल नागपूरचे डॉ.चंद्रशेखर पाखमोडे,नियुरो केअर हॉस्पिटलचे डॉ.क्षितीज गुल्हाणे, राणा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे प्रशांत वानोडे या शिवाय अनिल वानोडे ,प्रतिभा खोब्रागडे, पूजा कांबळे, तुषार खोब्रागडे , राहुल शाहू उपस्थित होते.

समाज नवीन विचाराने कसा पुढे जाईल आणि पुढील पिढीसाठी काय उपक्रम राबविता येईल यावर विचार मंथन करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आम्ही अजून नवीन उंची गाठून समाजाचं नाव रोशन करु असे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले.

डॉ.माधवी खोडे- चवरे यांनी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.जिल्हाधिका-च्या परीक्षेकरीत मार्गदर्शन करण्याची हमी त्यांनी या वेळी दिली.संजय पाटील यांनी संस्थेच्या आज पावेतो पार पडलेल्या विविध कार्यक्रमांना आपल्या भाषणातून उजाळा दिला.डॉ. पाखमोडे, डॉ. गुल्हाने यांची या वेळी भाषणे झालीत

सुपरिचित चित्रकार पूजा कांबळे यांनी आपल्या कलेतून डॉ. माधवी खोडे यांचे एक चित्र हुबेहूब रेखाटले होते . त्या सुंदर व सुरेख चित्राने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.कार्यक्रमाचे सुरेख संचालन नागपूरच्या समाजसेविका चित्रा माकोडे यांनी केले.