Home Breaking News Chandrapur dist@ news •प्रहारच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी सतीश बिडकर व शेरखान...

Chandrapur dist@ news •प्रहारच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची नियुक्ती! •तर प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांतीच्या जिल्हा प्रमुख पदी पंकज माणूसमारे यांची निवड!

260

Chandrapur dist@ news
•प्रहारच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची नियुक्ती!

•तर प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांतीच्या जिल्हा प्रमुख पदी पंकज माणूसमारे यांची निवड!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची तर प्रहारच्या दिव्यांग आंदोलन क्रांतीच्या जिल्हा प्रमुख पदी पंकज माणूसमारे यांची निवड करण्यात आली आहे.बिडकर यांच्या कडे चंद्रपूर बल्लारपूर, मुल पोंभूर्णा ,राजुरा,कोरपना, जिवती, गोंडपिपरी, हे तालुके तर शेरखान पठाण यांच्याकडे भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी,नागभिड,सिंदेवाही, सावली, हे तालुके देण्यात आली आहे.पक्षातील कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .दरम्यान प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे दि.२६ सप्टेंबरला चंद्रपूर येथे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या आदेशाने हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे. बिडकर पठाण व माणूसमारे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात प्र-हार पक्षाचे व बच्चू कडू यांचे विचार गावागावांत रुजविण्यासाठी सदैव काम करीत राहणार असल्याचे नवनियुक्त पदाधिका-यांनी म्हटले आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात पक्षाची मजबुत बांधणी करत बच्चू कडू यांच्या विचारांना बळकटी देण्याचा निर्धार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे , संजय गोमकाळे, अतुल निमरड, अमित बहादुरे,अक्षय बोंदगुलवार, गणेश उराडे, संदीप झाडे विशाल कुडे, अमोल दातारकर, हर्षल ढोके, अमोल काटकर, ओंकार कांबळे, परमेश्र्वर वाघमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे व जिल्ह्याभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.