♦️बापूचे बलिदान♦️
♦️◻️सौ. वंदना अजय आगलावे (बोढे)सहज सुचलं काव्यकुंज सदस्य वरोरा
भारत भूमीला स्वतंत्र करण्या
बापूने दिले बलिदान
छोडो भारत नारा क्रांतीचा
इंग्रजांना केले हैराण….
सत्य अहिंसा अस्तेय
जीवनभर हीच त्रिसूत्री
कायम लढला सन्मार्गने
स्वतंत्र मिळेल होती खात्री….
एक दिवस असा आला
करेंगे या मरेंगे नारा दिला
संतापून उठली जनता सारी
पळवून लावले इंग्रजांना….
झाड झडूले शस्त्र बनले
घराघरांतून वीर लढले
इंग्रजांनी फितुरी केली
क्रांतिकारकांना फासावर चढवले…
स्वतंत्र करण्या भारत देशाला
तुम्ही प्राण पणाला लावले
तुमचे बलिदान सार्थकी लागले भारतीय स्वातंत्र्य सक्षम बनले