Home Breaking News Ghugus city@ news • लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे तीन शाळेत प्रशिक्षणाचे आयोजन

Ghugus city@ news • लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे तीन शाळेत प्रशिक्षणाचे आयोजन

139

Ghugus city@ news
• लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे तीन शाळेत प्रशिक्षणाचे आयोजन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच द्विपजलीत करुन शाळेच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम उत्साहात आयोजन करण्यात आले.

लॉइड्स इनफिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस,न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा व इंदिरा गांधी विद्यालय पडोली या तीन शाळांच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाला तिन्ही शाळांतील २७ शिक्षकांनी हजेरी लावली.सदर प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे शिक्षण विभाग प्रमुख सुधीरकुमार गजभिये व या प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सौ. कांचन थोरवे मॅडम लाभले,सदर प्रशिक्षणात लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ची ओळख, ट्रेनिंग ची आवश्यकता, सेल्फ एस.डब्लु.ओ.टी.स्कूल,एस.डब्लु.ओ.टी. बाल मानसशास्त्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना विषयासंदर्भात अधिक स्पष्टता यावी यासाठी केवळ मार्गदर्शन न करता विविध उपक्रमांचा वापर करण्यात आला. यामध्ये गटातील उपक्रम,गट सादरीकरण,आत्मपरीक्षण, नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण यासारख्या पद्धतींचा वापर करण्यात आला. याने प्रशिक्षणार्थींना विषय अधिक प्रभावीपणे समजण्यात मदत झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनच्या सी.एस.आर.प्रमुख नम्रपाली गोंडाने मॅडम दोन्ही दिवस उपस्थित होत्या. सोबतच शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ने नेमणूक केलेले एस,ए,सी. शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित होते.

प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी अतिशय सकारात्मक असे अभिप्राय व्यक्त केले. हे प्रशिक्षक व प्रशिक्षण उच्च दर्जाचे आहेत असे मत यावेळी शिक्षकानी मांडले. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या विकासात खूप फायदा होईल अशी आशा व्यक्त करत या दोन दिवसिय प्रशिक्षणाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या ए.सी.ई.पी. प्रकल्पाचे समन्वयक मुकेश भोयर, सहाय्यक समन्वयक रश्मी होले, मिलिंद काटकर,सूमैय्या मिर्झा, पायल राजपूत, प्रज्ञा पवार यांनी अथक परिश्रम घेतले.