Home Breaking News Chandrapur dist@ news • प्रणिता कांबळेंना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भावना मोडक,निलम झाडे,...

Chandrapur dist@ news • प्रणिता कांबळेंना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भावना मोडक,निलम झाडे, श्रूतिका नन्नावरे,कला कोडापे,किरण साळवींसह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन!

117

Chandrapur dist@ news
• प्रणिता कांबळेंना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भावना मोडक,निलम झाडे, श्रूतिका नन्नावरे,कला कोडापे,किरण साळवींसह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य तथा सोलापूर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना
राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार मराठी साहित्य मंडळाच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.यंदाचा हा पुरस्कार सोलापूर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे ह्यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याकरिता काही दिवसांपूर्वी मंडळाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले होते.

ह्या प्रस्तावा मधून तज्ञ निवड समितीने कांबळे ह्यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत त्यांना सदरहु पुरस्कार जाहीर केला आहे. कांबळे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने समाजात एक आगळी वेगळी छाप सोडली आहे.इतकेच नाही तर त्यांना आजपावेतो ६ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे.निश्चितच सोलापूरकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. हा पुरस्कारा जाहीर झाल्याबद्दल कांबळे ह्यांचे विविध स्तरावरुन कौतुक व अभिनंदन होत आहे.दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे ,संयोजिका रंज्जू मोडक ,सहसंयोजिका वर्षा कोंगरे, जागतिक पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार , निलम झाडे , भावना मोडक, वनिता नागपूरे ,कला कोडापे,श्रूतिका नन्नावरे अल्का सदावर्ते, सविता भोयर ,नंदिनी लाहोळे,सिमा पाटील, पायल दुपारे,रश्मी पचारे प्रिती उमरे, रिना तेलंग ,माया बांगडे ,प्रगती करमरकर विजया तत्वादी ,स्मिता बांडगे, विजया भांगे, सरोज हिवरे, चैताली आत्राम, व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या कु.किरण साळवी, कल्पना बनकर, दिपाली जाधव, मंथना नन्नावरे,दिक्षा तेली , संगिता पाटील, किर्ती पांडे, वर्षा शेंडे, कु.मंगल मिसाळ, अनिता क-हाडे आदींनी प्रणिता कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.