Home Breaking News Mul taluka @ news •नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे देण्याची उलगुलान संघटनेची...

Mul taluka @ news •नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे देण्याची उलगुलान संघटनेची मागणी ! •मूल तहसीलदारांना सादर केले निवेदन

66

Mul taluka @ news
•नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे देण्याची उलगुलान संघटनेची मागणी !
•मूल तहसीलदारांना सादर केले निवेदन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मूल: शहरातील नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे द्यावे अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने आज करण्यात आली असून या बाबतीत एक लेखी निवेदन मूलच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले असल्याचे राजू झोडे यांनी सांगितले.मूल शहरातील महसूल विभाग व रेल्वेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक घरे बांधून वास्तव्य करीत आहेत.मात्र त्यांना अद्यापही स्थायी स्वरूपाचे पट्टे मिळाले नाही . त्यांच्या नावावरती त्या जमिनीचे पट्टे नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनेचा कुठलाही लाभ घेता येत नाही . एव्हढेच नाही तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे

मूल शहरात नागरिक ब-याच वर्षांपासून घरे बांधून राहत आहे. पण त्यांना स्थायी पट्टे मिळाले नाही.आता तरी तेथील नागरिकांना तात्काळ स्थायी पट्टे देण्यात यावे अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यांना स्थायी पट्टे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, डेविड खोब्रागडे, मनोज जाबूळे , सुरेश फुलझले, आशीष दुर्योधन, सुजीत खोब्रागडे व मूल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .