Home Breaking News Chandrapur dist@ news •महिण्याकाठी गलेलठ्ठ वेतन उचलणारे ग्रामसेवक बुवा अडकले लाचलूचपत प्रतिबंधक...

Chandrapur dist@ news •महिण्याकाठी गलेलठ्ठ वेतन उचलणारे ग्रामसेवक बुवा अडकले लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचा जाळ्यात! •देवानंद गेडाम यांना हवी होती लाच !

196

Chandrapur dist@ news
•महिण्याकाठी गलेलठ्ठ वेतन उचलणारे ग्रामसेवक बुवा अडकले लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचा जाळ्यात!
•देवानंद गेडाम यांना हवी होती लाच !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर :लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पुरेपूर कल्पना असतांना देखील एका ग्रामसेवकास लाचेचा मोह टाळता आला नाही अखेर आज तो लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात लाच घेताना अलगद अडकला!या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते कि 15 व्या वित्त आयोगातून वर्ष 21- मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत योगा शेडचे बांधकाम करण्यात आले होते, त्याचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने चक्क टक्केवारीची मागणी केली, आणि याच
5 टक्के लाचेसाठी ग्रामसेवक बुवा रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. दरम्यान या घटनेमुळे शासकीय विभागात आज एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे मौजा उमरी पोतदार येथील रहिवासी असून जिल्हा परिषद अंतर्गत 15 व्या वित्त आयोगातून योगा शेचे बांधकाम एकूण किंमत 3 लाख 49 हजार 321 रुपयांचे काम पूर्णत्वास आले, त्यानंतर मटेरिअल व साहित्य पुरवठ्याचे 2 लाख 44 हजार 525 रुपयांचे बिल ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी काढून दिले होते.

6 हजार Mah ची पॉवर पॅक बॅटरी, 5g मोबाईल फक्त 12 हजार रुपयात, आजच खरेदी करा!योगा शेड बांधकामाला लागलेला एकूण खर्चावर ग्रामसेवकाने 5 टक्के 17 हजार 500 रुपयांची मागणी ग्रामसेवकाने तक्रारदाराला केली. तडजोडीअंती 13 हजार रुपये देण्याचे ठरले मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागात तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी केल्यावर 6 ऑक्टोबरला लाचलुचपत विभागाने सापळा रचला, ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष देवानंद गेडाम यांनी 13 हजारांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, तसेच कार्यालयीन कर्मचारी संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व प्रदीप ताडाम यांनी केली.